Home /News /pune /

चंद्रकांत पाटलांना पुणे न्यायालयाचा दणका, दिले पोलिसांना चौकशीचे आदेश

चंद्रकांत पाटलांना पुणे न्यायालयाचा दणका, दिले पोलिसांना चौकशीचे आदेश

2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढले होते.

    पुणे, 22 ऑगस्ट : कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दाखल केले आहे त्यात गुन्ह्याची माहिती लपवण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. पुणे न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर 16 सप्टेंबरपर्यत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढले होते. पण, प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढत असताना शपथपत्रामध्ये संपत्ती आणि स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती द्यावे लागते. पण चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मालकीच्या दोन कंपन्याची माहितीच या प्रतिज्ञापत्रात दिली नाही. त्यामुळेच  कोथरूडमधील डॉ. अभिषेक हरिदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेनंतर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.  त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी 2016 मध्य 2019 मध्ये उत्पन्नाची खोटी माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे.  2012 मध्ये चंद्रकांत पाटलांवर कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती लपवण्यात आली आहे. या खटल्यात पाटलांविरोधात दोषारोपपत्रही सादर झाले आहे. पण तरीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी असी मागणी  हरिदास यांनी आपल्या तक्रारीमध्ये  केली आहे. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. दरम्यान, न्यायालयाने तक्रार दाखल केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. न्यायालयाने माझ्या विरुद्ध केली तक्रारची माहिती अजून मिळाली नाही. त्याची प्रत लवकरच हाती येईल. पण ही तक्रार राजकीय सूडबुद्धीने केली आहे, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Chandrakant patil, चंद्रकांत पाटील, भाजप

    पुढील बातम्या