पुण्यातील कॉसमॉस बँकेवर Cyber Attack, पोलिसांना मिळालं मोठं यश

पुण्यातील कॉसमॉस बँकेवर Cyber Attack, पोलिसांना मिळालं मोठं यश

अशा प्रकारे सायबर हल्ल्यात चोरीला गेलेली रक्कम परदेशातून परत मिळवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

  • Share this:

पुणे,18 फेब्रुवारी: पुण्यातील कॉसमॉस बँकेवर ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या सायबर हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या सायबर हल्ल्यात चोरट्यांनी कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) हल्ला केला होता. सुमारे 94 कोटी 42 लाख रुपये लंपास केले होते. यातील 5 कोटी 73 लाख रुपये परत मिळविण्यात पुण्याचा सायबर पोलिसांना यश मिळालं आहे.

अशी परत मिळवली परदेशातून रक्कम

अशा प्रकारे सायबर हल्ल्यात चोरीला गेलेली रक्कम परदेशातून परत मिळवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बॅंकेचे मुख्यालय आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सायबर चोरट्यांनी याच मुख्यालयातील बँकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) मालवेअर हल्ला चढवला होता. त्याद्वारे त्यांनी सुमारे 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. तब्बल 26 देशांतील बँकांच्या एटीएममधून हे पैसे काढण्यात आले होते. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात आली होती. या घटनेमुळे तेव्हा संपूर्ण भारतात एकच खळबळ माजली होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे) संभाजी कदम यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्ला करत तब्बल 94 करोड 42 लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला होता. 11 ऑगस्ट 2018 रोजी ही घटना घडली होती. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई करत आहे. चोरट्यांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे क्लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे तपासात समोर आले होतं. एकूण रक्कम 94 कोटी रुपयांची आहे. मात्र अटक आरोपींनी 89 लाख रुपये कोल्हापुरमधील वेगवेगळ्या एटीएममधून कार्ड क्लोन करुन काढले आहेत. बाकी पैसे कोणी आणि कसे काढले याबात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सिस्टिमची फसवणूक करुन पैसे काढण्यात आल्यानंतर हे पैसे 28 देशांमधील एटीएममधून काढले गेल्याचं आणि त्यापैकी अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यामुळे अटक आरोपींचा कोणत्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

First published: February 18, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading