S M L

'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास

पुण्यात कॉसमॉस बँकेच्या हेडक्वार्टरमधून सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये हॅक करण्यात आले आहेत.

Updated On: Aug 14, 2018 11:41 AM IST

'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास

पुणे, 14 ऑगस्ट : पुण्यात कॉसमॉस बँकेच्या हेडक्वार्टरमधून सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये हॅक करण्यात आले आहेत. फेक ट्रान्झेक्शनच्या माध्यामतून ही रक्कम वळवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जवळपास 500 जणांच्या खात्यातून  यातील जवळपास 72 कोटी रूपये हाँगकाँगच्या बँकेमध्ये वर्ग करण्यात आलेत. या प्रकरणी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या सायबर सेलकडे तक्रार केलीय.

दरम्यान एटीएम आणि पास सारख्या सेवांमध्ये वापरला जाणारा डेटा ज्या ग्राहकांसाठी आहे तो चोरून हा सगळा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय. त्यासाठी ग्राहकांना जे मेसेजस पाठवले जातात,  तसेत मॅसेज हॅकरने व्हर्चुअल मेसेज पाठवून बँकेची परवानगी घेतल्याचा आभास निर्माण करून हे सगळे व्यवहार केल्या गेल्याचं समोर आलं आहे.

या सगळ्या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून बँकेकडून ठेवीदारांना स्वस्त करण्यात येते. कॉसमॉस बँकेच्या जवळपाल ५०० खातेदारांच्या १३ हजार फेक ट्रान्सॅक्शनद्वारे 94 कोटी रुपये विदेशात ट्रान्स्फर झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याबाबत बँकेच्या वतीने पुणे शहर गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम सेलकडे लेखी अर्ज करण्यात आला आहे. त्याचबरोबर रिझर्व बँकेलाही यासंदर्भात माहिती दिली असल्याचं बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोणत्याही खातेदारांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांची रक्कम ही सुरक्षित आहे. असं आव्हान बँकेक़डून करण्यात आलं आहे. हा एक मोठा हल्ला आहे. त्यामुळे संपूर्ण संस्था आता या प्रकरणाचा शोध घेत आहे असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा काय घोटोळा आहे याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

VIDEO : कोब्राला वाचवण्यासाठी 'तो' विहिरीत उतरला

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 11:36 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close