पुणे, 28 जुलै : राज्यात सध्या कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. अशात रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यात तर कोरोनाने आता उच्चांक गाठला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका रात्रीत तब्बल 114 रुग्ण वाढले आहेत. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पुण्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता 72896 झाली आहे तर आतापर्यंत 1737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्यात मोठी वाढ होत आहे. 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांवर जाऊ शकते, त्यापैकी 48 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात असा अंदाज पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. 31 जुलैपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 27 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात. सध्याच्या रूग्णवाढीनुसार पुणे मनपाने हा अंदाज व्यक्त केला आहे.
Weather Alert: महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला अलर्ट
बाहेरून येणाऱ्या रूग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखांचा टप्पा करू शकते पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात आत्तापर्यंत 40931 रॅपिड अँन्टीजेन टेस्ट, त्यापैकी 8363 पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले. पुणे मनपा 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहे. कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालवली, कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही. परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी', अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
कोरोनासोबत वाढला आणखी एका संसर्गाचा धोका, या जिल्ह्यात वाढली रुग्णसंख्या
राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, सुटसुटीत करण्यासाठी करणार तब्बल 11 बदल
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यात राज्य शासन 50% पुणे महानगरपालिका 25% पिंपरी चिंचवड महानगरपालिका 12.5% आणि पीएमआरडीए 12.5% असा हिस्सा उचलणार आहेत.'