Home /News /pune /

पुण्यात कोरोनाचा उद्रेक थांबेना, गेल्या 24 तासांत असा वाढला रुग्णांचा आकडा

पुण्यात कोरोनाचा उद्रेक थांबेना, गेल्या 24 तासांत असा वाढला रुग्णांचा आकडा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयीत रुग्णांची तातडीने टेस्ट करून त्यांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न सगळेच देश करत आहेत. त्यासाठी तातडीने टेस्ट करणं आणि त्याचा निकाल येणं गरजेचं आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयीत रुग्णांची तातडीने टेस्ट करून त्यांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न सगळेच देश करत आहेत. त्यासाठी तातडीने टेस्ट करणं आणि त्याचा निकाल येणं गरजेचं आहे.

पुणे शहरसह जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शहरालगतचा हवेली तालुकाही आता कोरोनाचा नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत.

    पुणे, 16 जुलै : राज्यात कोरोनाचा कहर काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात दिवसभरात 1812 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 764 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात 17 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात 536 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 80 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 31884 वर पोहोचली आहे. पुण्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 10644 असून एकूण 906 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण 20334 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. धक्कादायक! परीक्षेत पास पण आयुष्याशी हारला, भावाच्या वाढदिवसाला संपवलं जीवन पुणे शहरसह जिल्ह्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शहरालगतचा हवेली तालुकाही आता कोरोनाचा नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. त्यात विशेषत: खडकवासला आणि खानापूर परिसरात तर 250 हून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावांनी लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच ही स्वयंपूर्तीने ही गावं बंद ठेवली आहेत. भयानक! या देशात लॉकडाऊन न पाळणाऱ्यांचा थेट होतो मर्डर, 8 लोकांचा मृत्यू खडकवासला, किरकिटवाडी, खानापूर, डोनजे, गोऱ्हे ही गावं कोरोनाबाधित असून रुगसंख्या 250 च्यावर पोहोचली आहे. दुसरीकडे नगर रोडला वाघोली, सोलापूररोडला मांजरी या पुण्यालगतच्या गावात सर्वाधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागात 4000 रुग्ण आहेत. त्यापैकी 2500 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Pune, Pune news

    पुढील बातम्या