पुणे महापालिकेचे अधिकारीच गॅसवर, महापौरांना कोरोना झाल्यामुळे खळबळ

पुणे महापालिकेचे अधिकारीच गॅसवर, महापौरांना कोरोना झाल्यामुळे खळबळ

महापौरांशी गेल्या चार दिवसात संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी स्व:ताला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे तर अनेक नगरसेवकही धास्तावले आहेत.

  • Share this:

पुणे, 07 जुलै : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापौरांशी गेल्या चार दिवसात संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी स्व:ताला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे तर अनेक नगरसेवकही धास्तावले आहेत.

यापूर्वी महापालिकेचे सहा नगरसेवक कोरोना ने बाधित झालेत तर आतापर्यंत जवळपास 200पेक्षा अधिक कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित आहेत. महापौर बाधित झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि शांतनू गोयल हेदेखील होम क्वारंटाईन आहेत.

यापूर्वी उपमहापौर सरस्वती शेडगे यांचे पती बाधित झाले होते. मात्र, उपमहापौर बाधित नसल्याचा खुलासा आरोग्यविभागाकडून करण्यात आला होता. महापौरांच्या दालनातील 30 कर्मचाऱ्यांच्यासुद्धा कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 15 जणांचे रिपोर्ट निगोटिव्ह आहेत तर बाकीचे रिपोर्ट अजून प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात Coronaviurs ला रोखणार हे 4 अधिकारी, अजित पवारांचा मोठा निर्णय

दरम्यान, नागिराकांनी नियम पाळले नाहीत ठाणे आणि नवी मुंबईप्रमाणेच पुणे शहरातदेखील कडक लॉकडाऊन जारी करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसंच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचं निदर्शनास येत आह, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

माजी आरोग्य मंत्र्यांचं कोरोनामुळे निधन, भाजपवर शोककळा

अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा थेट इशारा इशारा नवल किशोर राम यांनी दिला आहे.

तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गेली नोटीस

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितले.

संपादन - रेणुका धायबर

Published by: Manoj Khandekar
First published: July 7, 2020, 8:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading