मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात ॲम्ब्युलन्सवरून राडा, मनसे नगरसेवक वसंत मोरेंनी फोडली सरकारी अधिकाऱ्याची गाडी

पुण्यात ॲम्ब्युलन्सवरून राडा, मनसे नगरसेवक वसंत मोरेंनी फोडली सरकारी अधिकाऱ्याची गाडी

वसंत मोरे यांनी कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळेत ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने महापालिकेच्या उपायुक्तांच्या वाहनाची तोडफोड सोमवारी केली आहे.

पुणे, 7 सप्टेंबर : पुण्यात बेड आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आणखी एक घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळेत ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने महापालिकेच्या उपायुक्तांच्या वाहनाची तोडफोड सोमवारी केली आहे.

वसंत मोरे यांचे नातेवाईक रुग्ण दक्षिण पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. त्यांचा रविवारी उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ॲम्बुलन्स वारंवार मागणी केल्यानंतरही ती वेळेत उपलब्ध झाली नाही. मोरे यांनी स्वतः ॲम्ब्युलन्ससाठी पाठपुरावा केल्यानंतर काही वेळाने ती उपलब्ध झाली.

तसेच रात्री साडेआठच्या दरम्यान त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपण नगरसेवक असतानाही महापालिका अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल तर, सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला आहे.

मोरे यांनी सोमवारी महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास यांच्याकडे झालेल्या घटनेचा जाब विचारला तसेच, त्यांच्या सरकारी ॲम्बेसिडर वाहनाची तोडफोड केली. त्यामुळे पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, MNS, Pune news