Home /News /pune /

मुंबईपाठोपाठ पुण्यातही परिस्थिती गंभीर; 12 जणांचा मृत्यू,12 व्हेंटिलेटरवर

मुंबईपाठोपाठ पुण्यातही परिस्थिती गंभीर; 12 जणांचा मृत्यू,12 व्हेंटिलेटरवर

मुंबईपाठोपाठ पुण्यातही दिवसभरात कोरोनारुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. दिवसभरात पुण्यात 99 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. 76 जणांची प्रकृती गंभीर आहे.

पुणे, 8 मे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही दिवसभरात कोरोनारुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. दिवसभरात पुण्यात 99 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय पुण्यात वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनारुग्णांपैकी 76 जणांची प्रकृती गंभीर आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचा अर्थ अजून पुढचे काही दिवस रुग्णसंख्या आणि परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसत नाहीत. आतापर्यंत पुण्यात 137 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2245 आहे. त्यातले सर्वाधिक रुग्ण डॉ. नायडू रुग्णालयात आहेत. पुण्यात मे अखेरपर्यंत 9000 वर रुग्ण होतील, असं विधान महापालिका आयुकांनी काल केलं होतं. परिस्थितीशी सामना करायला तशी तयारीही सुरू झालेली दिसते. पुण्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या मानाने हा आकडा भयावह आहे. वाचा - हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ, सलाईनमध्ये सापडलं शेवाळ पुण्यात 31 मे पर्यंत आकडा 9000 वर जाण्याची शक्यता आहे, असं पुणे मनपा आयुक्त गायकवाड म्हणाले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी पुणे पालिकेने तब्बल 9 हजार बेड्सचं तात्पुरतं कोविड आयसोलेशन सेंटर उभारणार असल्याचं सांगितलं आहे. बालेवाडी क्रीडा संकुलातील विविध इनडोअर हॉल्समध्ये तात्पुरते कोविड विलगीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तातडीने तात्पुरत्या बेड्सची खरेदी करण्यात येणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रतिबंध असूनही... प्रतिबंधित क्षेत्रातले (Containment Zone) निर्बंध कडक करून, लॉकडाऊन वाढवूनही महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढतोच आहे. आज राज्सात 1089 नवीन रूग्णांची नोंद झाली, तर 37 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 19000 च्या वर जात 19063 वर पोहोचला आहे.  मुंबईतच आज 748 नवे रुग्ण आढळले. आता मुंबई शहरातला आकडा 12142 वर पोहोचला आहे. वाचा - पुण्यातील म्युझियमने खरेदी केली पाक क्रिकेटपटूची बॅट, 'या' कारणासाठी केला लिलाव राज्यातून आजपर्यंत 3470 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे. 2 लाख 39 हजार 531 जण आज होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13,494 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३ हजार ५५२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५२.६४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे मुंबईतल्या कोरोना प्रसाराचा वेग आटोक्यात आलेला नाही. शहरातली परिस्थिती लक्षात घेत महापालिकेच्या प्रशासनातही मोठे बदल आज करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांनी तातडीने कार्यभार स्वीकारला आहे. ' लॉकडाऊनचं काय करायचं...' उद्धव ठाकरेंच्या संवादामधले 10 महत्त्वाचे मुद्दे मुंबईतल्या कोविड परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. "मुंबईत लष्कर आणणार, अशा अफवा काही जण पसरवत आहेत. ते अजिबात होणार नाही", असं उद्धव म्हणाले. पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणार मोठी वाढ; 9000 क्वारंटाइन बेड्सची तयारी "मुंबईत लष्कर येणार ही अफवा. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही", अशी ग्वाही त्यांनी दिली. "केंद्र सरकारला विनंती आहे की, पोलिसांना विश्रांती देण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. केंद्र सरकारकडे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मागावं लागेल. याचा अर्थ लष्कराला पाचारण केलं असा नाही.  म्हणून आधी तुम्हाला सांगतो आहे", असं ठाकरे म्हणाले. मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या