पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली माहिती

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली माहिती

आणखी एका लोकप्रतिनिधीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  • Share this:

जुन्नर, 29 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यातच आणखी एका लोकप्रतिनिधीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वत: आमदार बेनके यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे.

'कोरोनाच्या संक्रमण काळात प्रशासनासोबत कार्य करताना अनेकांशी संपर्क येत होता. गुरुवारी 27तारखेला त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी माझ्या संपर्कात आले, त्यांनी काळजी म्हणून स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी,' असं आवाहन अतुल बेनके यांनी केलं आहे.

'...तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो', अतुल बेनके यांची फेसबुक पोस्ट :

"मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला आजही देत आहेत. जुन्नर तालुका प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा असे मी स्वतः वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी.

आज मी स्वतः कोरोनाबाधित झालो असलो तरीही, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो. हा लढा आपण जिंकणारच!"

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2020, 10:57 PM IST

ताज्या बातम्या