Home /News /pune /

दारूला परवानगी देणाऱ्या सरकारने मॉर्निंग वॉकलाही मुभा द्यावी, पुण्यातून नवी मागणी

दारूला परवानगी देणाऱ्या सरकारने मॉर्निंग वॉकलाही मुभा द्यावी, पुण्यातून नवी मागणी

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray formally takes charge of his office, in Mumbai, Friday, Nov. 29, 2019. (Twitter/PTI Photo) (PTI11_29_2019_000181B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray formally takes charge of his office, in Mumbai, Friday, Nov. 29, 2019. (Twitter/PTI Photo) (PTI11_29_2019_000181B)

सरकारने मास्क घालून मॉर्निंग वॉकला परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातील सजग नागरिक मंचने केली आहे.

पुणे, 5 मे : सोशल डिस्टन्सिंग पाळून दारूला परवानगी देणाऱ्या सरकारने मास्क घालून मॉर्निंग वॉकला परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातील सजग नागरिक मंचने केली आहे. याबाबत सजय नागरिक मंचच्या विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. काय आहे सजग नागरिक मंचचे पत्र? "कालपासून पुणे शहरातील संसर्गजन्य भाग सोडून अन्य भागांत लॉकडाऊनमधून सवलती देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांखेरीज दारू विक्रीच्या दुकानांसह अनेक दुकानांना ठराविक वेळेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नागरीक लाईनमध्ये उभे राहून social distancing पाळून, मास्क घालून व्यवहार करत आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळच्या फ्रेश हवेत व्यायाम म्हणून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सुध्दा social distancing पाळण्याच्या आणि मास्क बांधण्याच्या अटींवर परवानगी देणे आवश्यक आहे. कोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, जे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे. एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारू आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉक वर मात्र बंदी कायम ठेवणे चुकीचे आणि अतार्किक आहे. आपणास विनंती की social distancing पाळून, mask बांधून मॉर्निंग वॉक करण्यास ( संसर्गजन्य विभाग सोडून) परवानगी द्यावी," अशी मागणी पत्राद्वारे सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune news, Uddhav thackeray

पुढील बातम्या