पुणे, 19 एप्रिल : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिलदरम्यान दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजवंताला घरपोच सामान दिला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
हेही वाचा..रवी राणा आणि नवनीत राणा यांचे थ्रोट सॅम्पल चुकीचे, AIIMS ने पाठवले परत
या भागातील मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही निवंगुणे म्हणाले. नागरिक सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत नसल्याने व्यापाऱ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. दुकाने बंद राहणार असली तरी ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना घरपोच डिलीव्हरी दिली जाणार आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनाथ सोमसे, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, सुनिल गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा.. कोरोनाची संशयित पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीनं घरीच केले उपचार
पिंपरी चिंचवड शहर कंटेन्मेंट झोन
दुसरीकडे, पिंपरी चिंचवड शहर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही घोषणा केली केली. आज (20 एप्रिल) मध्यरात्रीपासून 27 एप्रिलपर्यन्त शहरातील सर्व सीमा आणि शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्ते बंद करण्याचे आयुक्तांचे आदेश दिले आहेत.
पुढील 7 दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असेल, अशी माहिती श्रावण हर्डीकर
यांनी दिली आहे.
संपादन- संदीप पारोळेकर