मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद, या महत्त्वाच्या ठिकाणांवरही बंदी

पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद, या महत्त्वाच्या ठिकाणांवरही बंदी

किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    पुणे, 17 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये असल्याने पुण्यात खबरदारीचा इशारा म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित16 रुग्णांची प्रकृती स्थिर असून 27 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचं अहवालात समोर आलं आहे. पण रुग्णांचा वाढता आकडा पाहता पुण्यात बाजारपेठांसह सगळी महत्त्वाची ठिकाणी बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद राहणार आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही. आजपासून पुण्यात या गोष्टींवर आहे बंदी - तुळशीबाग पाठोपाठ सुप्रसिद्ध हॉंगकॉंग लेन शॉपिंग ही 3 दिवस बंद राहणार आहे. - सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढं ढकलल्या - ग्रामदैवत कसबा गणपतीचंही दर्शन बंद - कोर्टाचे काम फक्त 11 ते 2 असं 3 तास चालणार - येरवडा जेलमधून व्हिडिओद्वारे कैद्यांशी संपर्क करणार. कैद्यांना कोर्टात आणणार नाही - 21 दिवस चाललेलं फुरसुंगी, उरुळी ग्रामस्थांचं कचरा विरोधी आंदोलन स्थगित हे वाचा - कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी! राज्यात यवतमाळ येथे 1 आणि नवी मुंबई येथे 1 असे 2 करोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. तसंच 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाइन आहे. त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी असल्याचं बोललं जात आहे. यवतमाळ येथे करोना बाधित आढळलेली 51 वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आयटी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे. दुबईला गेलेल्या 40 जणांच्या चमूतील एकूण 15 जण करोना बाधित आढळले असून 22 जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील 3 जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे. हे वाचा - पाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले आज करोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या 10 जणांच्या चमूतील 3 जण करोना बाधित आढळले असून इतर 7 जण करोना निगेटिव्ह आढळले आहेत. पिंपरी चिंचवड मनपा 9, पुणे मनपा 7, मुंबई 6, नागपूर 4, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण 3, रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी 1 असे एकूण 39 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 31 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 16 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1663 विमानांमधील 1 लाख 89 हजार 888 प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 1063 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 794 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या