पुण्यात जी चूक तरुणाने केली तीच 30 वर्षीय महिलेकडूनही झाली, अवघ्या 8 तासांत झाला मृत्यू

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्याच चुकीमुळे आणखी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्याच चुकीमुळे आणखी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:
    पुणे, 27 मे : कोरोना व्हायरससारख्या जगभर थैमान घालणाऱ्या संकटात जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अशी काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं, हे दाखवणारी आणखी एक दु:खद घटना पुण्यात घडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्याच चुकीमुळे आणखी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. लक्षण दिसत असताना उपचारासाठी उशीर केल्याने पुण्यातील 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एका महिलेला 22 मे रोजी श्वास घेण्यास त्रास व्हायरला लागला. तसच ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मात्र या महिलेनं तीन दिवस त्याकडे दुर्लक्ष करत उपचार घेणं टाळलं. अखेर 25 तारखेला त्रास वाढल्याने या महिलेनं रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचार सुरू झाल्यानंतर आठ तासांमध्ये या महिलेचा मृत्यू झाला. याबाबत 'TV9 मराठी'ने वृत्त दिलं आहे. यापूर्वी काय घडलं होतं? पुण्यातील गुलटेकडी या परिसरात राहणाऱ्या एक तरुणाला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. मात्र आपल्याला काही होणार नाही, असा अतिआत्मविश्वास की कोरोनाबद्दलची भीती...नेमकं कारण माहीत नाही. मात्र या तरुणाने होणाऱ्या शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करत उपचार घेणं टाळलं. मात्र 22 मे रोजी या तरुणाला त्रास असह्य झाला आणि त्याने रुग्णालयात जाण्याचं ठरवलं. हेही वाचा - पुण्यात अचानक का वाढला कोरोनाबाधितांचा आकडा, महापौरांनी केला महत्त्वाचा खुलासा श्वसनाचा त्रास होत असलेल्या संबंधित तरुणाला 22 मे रोजी रात्री साडेसात वाजता रुग्णालयता दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच या तरुणाचा मृत्यू झाला. लक्षणं दिसत असतानाही उपचारासाठी रुग्णालयात न जाण्याच्या चुकीने या तरुणाचं आयुष्य हिरावून घेतलं. 23 मे रोजी आलेल्या अहवालातून सदर तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. संकलन, संपादन - अक्षय शितोळे
    First published: