Home /News /pune /

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, असा आहे आजचा आकडा

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, असा आहे आजचा आकडा

पावसाळ्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घरातदेखील चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. पण घरातली आणि बाहेर घालण्याची चप्पल वेगळी ठेवा. वेळोवेळी घर, घरातल्या वस्तू, दारं-खिडक्या स्वच्छ ठेवा, घराचा मजला साफ ठेवा आणि दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा प्रयत्न करा.

पावसाळ्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घरातदेखील चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. पण घरातली आणि बाहेर घालण्याची चप्पल वेगळी ठेवा. वेळोवेळी घर, घरातल्या वस्तू, दारं-खिडक्या स्वच्छ ठेवा, घराचा मजला साफ ठेवा आणि दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा प्रयत्न करा.

पुण्यातही कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात 452 ने वाढ झाली आहे.

    पुणे, 12 जून : राज्याला कोरोनाव्हायरसचा हाहाकार वाढत असतानाही आजही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजही राज्यात 3493 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 1 लाख 1 हजार 141 वर गेला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 3717वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त 90 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1718 रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण 47796 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 47.3 एवढं असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यातही कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात 452 ने वाढ झाली आहे. तर पुणे विभागातील 08 हजार 862 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 077 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 04 हजार 575 आहे. 'धनंजय मुंडेंची दोनदा कोरोना चाचणी झाली पण...', राजेश टोपेंचा मोठा खुलासा विभागात कोरोनाबाधीत एकुण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 286 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यातील 10 हजार 973 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 06 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 03 हजार 596 आहे. कोरोनाबाधित एकूण 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 259 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 452 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 330, सातारा जिल्ह्यात 15, सोलापूर जिल्ह्यात 92, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 09 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातारा जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 448 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 1504 कोरोना बाधित रुग्ण असून 805 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 567 आहे. कोरोना बाधित एकूण 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांदीच्या किंमतीत या महिन्यातली सगळ्यात मोठी घसरण, काय आहे 10 ग्राम सोन्याचा भाव सांगली जिल्हयातील 192 कोरोना बाधीत रुग्ण असून 103 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 83 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 102 आहे. कोरोना बाधित एकूण 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 01 लाख 10 हजार 114 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 06 हजार 452 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 03 हजार 662 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 92 हजार 126 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 14 हजार 077 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. शेतकरी बापाला असा सलाम कोणीच केला नसेल, या फोटोमागच्या लेकीची कहाणी उर भरून आणेल
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या