Home /News /pune /

पुण्यात कोरोना हाताबाहेर, एका दिवसात समोर आली रुग्णांची धक्कादायक आकडेवारी

पुण्यात कोरोना हाताबाहेर, एका दिवसात समोर आली रुग्णांची धक्कादायक आकडेवारी

कोरोनाच्या आजच्या सर्वाधिक आकडेवारीने पुणेकरांची चिंता वाढली.

    पुणे, 20 जून: राज्यात आज रुग्णवाढीचा आणि मृत्यूंचा नवा उच्चांक झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 3874 नवे रुग्ण आढळले. तर आज तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात राज्यात एकूण 128205 रुग्ण झाले आहेत. तर 5148 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. राज्यातल्या 160 पैकी तब्बल 136 मृत्यू फक्त मुंबईतले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्र हादरुन गेला आहे. अशात पुण्यातही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला. चिंताजनक म्हणजे पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 823 रुग्ण वाढले असून पिपरी चिंचवड पहिल्यांदाच 381 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा 15 हजारांच्या पुढे गेल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसभरात 15 जणांचा कोरोनाने बळी गेला असून आत्तापर्यंत 584 मृत्यू झालेत. मुंबईत आज 1190 रुग्णांची वाढ झाली. तर तब्बल 136 जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात आज सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची एकूण संख्या ही 65329 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 3561 वर गेला आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आज सलग सातव्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारहून अधिक आहे. आज 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. तर, गेल्या 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 95 हजार 048 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 लाख 68 हजार 269 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 12 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    पुढील बातम्या