Home /News /pune /

Pune Corona Update रुग्णसंख्या तीन आकडी, धन्यवाद पुणेकर! महापौरांनी व्यक्त केला आनंद

Pune Corona Update रुग्णसंख्या तीन आकडी, धन्यवाद पुणेकर! महापौरांनी व्यक्त केला आनंद

Pune Corona Update सोमवारी पुण्यात रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही तीन आकडी झाल्यानं महापौर मुरलीधर मोहोळ यांनीदेखिल आनंद व्यक्त केला आहे.

    पुणे, 17 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांच्या यादीत पुणे (Pune) शहर आघाडीवर होतं. मात्र आता पुण्यात रुग्णसंख्या (Pune Corona Patients) कमी होत असल्यानं प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सोमवारी पुण्यात रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला (Pune corona numbers decreased) मिळाली आहे. कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही तीन आकडी झाल्यानं महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनीदेखिल आनंद व्यक्त केला आहे. (वाचा-Cyclone Tauktae: सोसाट्याच्या वाऱ्याने ठाण्यातील शासकीय रुग्णालयाची कमान कोसळली) राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर मुंबईनंतर सर्वाधिक चर्चा असलेलं शहर पुणे ठरलं होतं. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा रोजचा आकडा प्रचंड वाढला होता. मात्र राज्य सरकारसह पुणे महानगर पालिकेनं केलेल्या उपाययोजना आणि नियोजनामुळं ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणणं शक्य झालं आहे. सोमवारी तर दुसऱ्या लाटेमधली आतापर्यंतची सर्वात कमी आकडेवारी पाहायला मिळाली. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्या नंतर दैनंदिन बधितांची सर्वात कमी संख्या सोमवारी आल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं. कोरोना रुग्णांची संख्या तीन आकडी असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाल्याचं महापौरांनी म्हटलं आहे. सोमवारच्या पुण्याच्या आकडेवारीचा विचार करता नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या अवघी 684 एवढी आहे. तर सोमवारी दिवसभरात 2790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी एकूण 7862 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारी झालेल्या मृत्यूचा आकडा 66 असून त्यात 23 रुग्ण पुण्याबाहेरचे असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे रविवारच्या तुलनेत नव्या कोरोना रुग्णांचा आकडा निम्म्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. रविवारी पुण्यात नवे 1317 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पण सोमवारी केवळ 684 नवे रुग्ण आढळले आहेत. (वाचा-Cyclone Tauktae: मुंबई हवामान केंद्रालाही चक्रीवादळाचा फटका; झाडांची पडझड) पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात येत असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी पुणेकरांचे आभारही मानले आहेत. पुण्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा 18440 एवढा आहे. आतापर्यंत एकूण 4 लाख 59 हजार 987 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 7749 रुग्णांनी कोरोनामुळं प्राण गमावले आहेत. मात्र कोरोनाची दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असल्यामुळं प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळं भविष्यात आणखी संकट आल्यात त्याची तयारी करण्यासाठी प्रशासनाला आता वेळ मिळणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Pune

    पुढील बातम्या