पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गेल्या 10 दिवसांत असा घटला कोरोनाचा आलेख

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गेल्या 10 दिवसांत असा घटला कोरोनाचा आलेख

पुणे शहरात 20 ऑगस्टपर्यंत कोरोना पॉजिटिव्ह संख्या 1 लाखांचा आकडा पार करेल, असा अंदाज पुणे मनपाच्या आरोग्य विभागानेच जुलैमध्ये वर्तवला होता.

  • Share this:

पुणे, 19 ऑगस्ट : पुण्यातील कोरोनाची साथ आता कुठे आटोक्यात येताना दिसू लागली. कारण गेल्या 10 दिवसात शहरातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही तब्बल 8 टक्क्यांनी घटली आहे. तसंच पेशंट्स दुपटीचा कालावधी देखील 30 दिवसांवरून 41 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. पुणे शहरात 20 ऑगस्टपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह संख्या 1 लाखांचा आकडा पार करेल, असा अंदाज पुणे मनपाच्या आरोग्य विभागानेच जुलैमध्ये वर्तवला होता. पण आज म्हणजेच 19 तारखेला पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या 76 हजारांच्या आसपास पोहोचली आहे.

अशातच बहुतांश Asymptotic पेशंट्स हे घरात बसून उपचार घेऊ लागल्याने पालिकेनं उभारलेली कोविड सेंटर्स ओस पडू लागलीत. यासोबतच आता ऑक्सीजन बेड्सचीही फारसी कमतरता जाणवत नाही आहे. ही पालिकेच्या दृष्टीने निश्चितच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. पण प्रत्यक्षात खरंच ग्राऊंड रिअॅलिटी तशी आहे का तपासण्यासाठी जरा कोरोनाच्या आकडेवारीवरही नजर टाकुयात...

Coronavirus : गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात उच्चांकी रुग्णवाढ; चिंता वाढली

पुण्यात कोरोनाची साथ नियंञणात?

- एकूण कोरोना चाचण्या 3 लाख 70 हजार

- एकूण पेशंट्स 76 हजार 157

- एकूण अॅक्टिव्ह पेशंट्स 14469

- अॅक्टिव्ह पेशंट्सच्या संख्येत 27 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत घट

- पेशंट्स डबलिंगचा रेट 30 दिवसांवरून 41 दिवसांपर्यंत वाढला

- रूग्ण रिकव्हरी दर70 टक्क्यांवरून 78 टक्क्यांवर!

- कोरोना पेशंट्स मृत्यूदर 2.38 टक्के

- सिरो सर्वेक्षणानुसार 51 टक्के पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज

पुणे पालिकेने घातला मोठा गोंधळ, कोरोनाच्या संकटात भोंगळा कारभार चव्हाट्यावर

या दिलासादायक आकडेवारीवरून पुण्यात कोरोनाचा आलेख फ्लॅटन झाल्याचं वाटत असलं तरी पालिका प्रशासन आताच कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. म्हणूनच पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी पुणेकरांना गणेशोत्सवाच्या काळात विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, आता पुण्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये बाहेरचे अनेक गंभीर कोरोना पेशंट्स उपचारासाठी दाखल येऊन दगावत असल्याने मृत्यूसंख्या वाढताना दिसतेय. यासोबतच वाढीव बिलाच्याही तक्रारी वाढताहेत. म्हणूनच पालिकेनं दीड लाखांवरील सर्व कोरोना बिलांचं प्रीऑडिट सुरू केलं आहे. त्याद्वारे आतापर्यंत 36 बिलांची रक्कम तब्बल 30 लाखांनी कमी केल्याचं पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना सांगितलं.

Good News: घर घेणं होणार आणखी स्वस्त, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

सिरो सर्वेक्षणात 51 टक्के पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळं पुणे शहर हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने जात असल्याचाही अंदाज व्यक्त होतो आहे. पण म्हणून लगेच पुणेकरांनी रिलॅक्स होण्याची अजिबात घाई करू नये. कारण, पुणेकरांवरचं कोरोना महामारीचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे. आजही दररोज हजार-बाराशे नवे पेटशंट्स सापडत आहेत. त्यामुळे पुणेकरांनो 'दो गजकी दुरी अभीभी जरूरी है...'

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading