मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात 3 सख्ख्या भावांचा कोरोनाने घेतला बळी; गोडबोले कुटुंबीयांवर शोककळा

पुण्यात 3 सख्ख्या भावांचा कोरोनाने घेतला बळी; गोडबोले कुटुंबीयांवर शोककळा

पुण्यातले प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. रमेश गोडबोले यांचं आणि त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांचं निधन एकेका आठवड्याच्या अंतराने झालं. वडील नीळकंठ बापू गोडबोले सराफ यांनी शंभरी पार केली होती. पण मुलांची दीर्घायुष्याची देणगी कोरोनाने हिरावली.

पुढे वाचा ...

पुणे, 25 एप्रिल: पुण्यात गेल्या दोन तीन पिढ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि सराफी सेवा देणारं कुटुंबीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेतल्या गोडबोले कुटुंबावर कोरोनाने मोठा वार केला. एका पाठोपाठ एक आठवड्यात या कुटुंबातल्या तीनही सख्ख्या भावांचा कोरोनाव्हायरसने बळी घेतला. प्रसिद्ध पॅथालॉजिस्ट आणि गोडबोले लॅबचे संचालक डॉ. रमेश गोडबोले, मागच्या पिढीतले प्रसिद्ध इंजिनीअर आणि जर्मन भाषा शिक्षक अरविंद गोडबोले, सोने-चांदी आणि सराफी व्यावसायिक विश्वनाथ तथा दादा गोडबोले या तीनही भावांचा एप्रिल महिन्यातच मृत्यू झाला.

डॉ. रमेश गोडबोले हे सर्वांत धाकटे बंधू. ते अलका टॉकीजच्या जवळ गोडबोले लॅबोरेटरीजचे संचालक होते. मधुमित्र या डायबेटिसविषयक मासिकाचे 30 वर्षं ते संपादक होते. निसर्गसेवक नावाच्या स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष  होते. कोथरूडमधलं प्रसिद्ध स्मृतिवन सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रमेश गोडबोले यांचं 23 एप्रिलला कोरोनामुळे निधन झालं. ते 80 वर्षांचे होते.

कोरोनाने घेतला संपूर्ण कुटुंबाचा घास; पुण्यातील कुचेकरांची हृदयद्रावक घटना

मधले बंधू अरविंद गोडबोले यांनी इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर जर्मनीत शिष्यवृत्ती मिळवली. काही वर्षं जर्मनीला राहिल्यानंतर ते मामृभूमीच्या ओढीने परतले आणि पुण्यात किर्लोस्करमध्ये अनेक वर्षं त्यांनी नोकरी केली. पुणे विद्यापीठात 20 वर्षं जर्मन भाषेचं शिक्षण ते देत होते. उत्सव कार्यालय त्यांनी सुरू केलं होतं. 12 एप्रिलला त्यांना मृत्यू झाला. ते 86 वर्षांचे होते.

'व्हेंटिलेटरवर आहे म्हणून काय झालं?' पुण्यातील Covid ICU मध्ये बासरीचे सुमधूर सूर!

 ज्येष्ठ बंधू विश्वनाथ गोडबोले हे वडिलोपार्जित सराफी व्यवसाय सांभाळत होते. महाराष्ट्र बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावरही ते काही काळ कार्यरत होते. पत्नी वसुधा, प्रसिद्ध डॉक्टर रघुनाथ गोडबोले, मुलगी विनया बापट, नातवंडं, पतवंडं असा परिवार त्यांच्या मागे आहे. त्यांचं वयाच्या 90 व्या वर्षी 17 एप्रिलला निधन झालं.

First published:

Tags: Coronavirus, Pune