पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून आली आनंदाची बातमी, कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच...

पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून आली आनंदाची बातमी, कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच...

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यात यश आल्याने येथील नागरिकांचं कौतुक करण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 15 मे : पुण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात जनता वसाहतीमध्ये जवळपास 50 दिवस कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्यात नागरिकांनी यश मिळवलं आहे. एकीकडे पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यात यश आल्याने येथील नागरिकांचं कौतुक करण्यात येत आहे.

सार्वजनिक स्वच्छता, रुग्णांची वेळेवर तपासणी आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे तसंच लॉक डाऊनमधील निर्बंधांचे स्वयंशिस्तीने पालन करणे, या सगळ्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यात जनता वसाहतीतील नागरिक यशस्वी झाले आहेत.

कशी आहे पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी?

सुमारे 100 एकरचा परिसर, 70 हजार इतकी लोकवस्ती, 5 वेगवेगळे रस्ते आणि शेकडो चिंचोळ्या गल्ल्या....पर्वतीच्या पायथ्याशी आणि मुठा कालव्याच्या काठावर पसरलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्ये नसतानाही सगळी बंधने स्वतःहून लादून घेतली. एकच मुख्य रस्ता येण्या-जाण्यासाठी खुला ठेवणे, दुकानात किंवा मंडईत गर्दी न करता घरपोच भाजीपाला आणि धान्य यांचं वितरण करणे, रुग्णांची वेळेवर नित्य तपासणी ,मास्क, सॅनिटायझरचा वापर, निर्जंतुकीकरण, सार्वजनिक स्वच्छता यावर भर दिल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्याची किमया इथल्या रहिवाश्यांनी करून दाखवली आहे.

राजकारण, आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून सगळे एकत्र आले. वसाहतीतील विविध सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कामे वाटून घेतली. कालच वसाहतीत राहणाऱ्या 2 जणांना वसाहतीबाहेर गेल्याने लागण झाल्याचे समोर आलं. त्यामुळं सतर्क होऊन आणखी कडक पहारा ठेवण्यात आला आहे.

पुणे शहरातही लाखो लोक विविध झोपडपट्ट्यात राहात आहेत. मात्र मुंबईतील धारावीप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. जनता वसाहतीतील स्वयंस्फूर्त शिस्तीचे अनुकरण दाट लोकवस्ती, झोपडपट्टी परिसरात होण्याची गरज आहे, ज्यामुळे कष्टकरी, हातावर पोट असलेल्यानां कोरोनाची बाधा होणार नाही.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 15, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading