Home /News /pune /

Pune Corona : पुणेकरांना मोठा दिलासा, कोरोना कमी होतोय, दिवसभरात 8200 जण कोरोनामुक्त

Pune Corona : पुणेकरांना मोठा दिलासा, कोरोना कमी होतोय, दिवसभरात 8200 जण कोरोनामुक्त

corona

corona

पुण्यात आता नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घसरताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यातली कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, असं म्हणायला तरी हरकत नाही.

पुणे, 28 जानेवारी : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यात (Pune Corona) आता नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घसरताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यातली कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरतेय, असं म्हणायला तरी हरकत नाही. पण तरीही रात्र वैऱ्याची, संकट अजून संपलेलं नाही. कोरोनाचा संसर्ग पु्न्हा वाढू शकतो. त्यामुळे आपण काळजी जरुरच घेतली पाहिजे. पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 374 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात 8 हजार 200 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे पुण्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता 36 हजार 340 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये घरी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पुण्यात आज दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद जाली. यामध्ये तीन रुग्ण हे पुण्याबाहेर आहेत. तर इतर शहराचे रहिवासी होते. पुण्यात सध्या 358 रुग्ण हे ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर 54 रुग्ण हे इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर, 34 रुग्ण हे नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात आज 10 हजार 980 चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 3 हजार 374 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. (रोहित-द्रविडच्या एण्ट्रीनंतर या 8 खेळाडूंना भीती, पुन्हा टीम इंडियात जागा नाही!) पुण्यातली नव्या कोरोनाबाधितांची तारखेनुसार आकडेवारी 28 जानेवारी - 3374 27 जानेवारी - 4136 26 जानेवारी - 5521 25 जानेवारी - 5271 24 जानेवारी - 3377 23 जानेवारी - 6299 22 जानेवारी - 8246 21 जानेवारी - 8301 20 जानेवारी - 7264 19 जानेवारी - 6441 18 जानेवारी - 6320 17 जानेवारी - 3959 मुंबईत कोरोनाची लाट ओसरली राज्यात सर्वात आधी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक प्रचंड मोठी वाढ झाली होती. कोरोनाबाधितांची आकडेवारी दररोज वाढत होती. दररोज 20 ते 25 हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. अखेर ही लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. जितक्या गतीने लाट पुढे सरकली तितक्याच गतीने ही लाट खाली कोसळली. मुंबईत आज दिवसभरात 1312 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 5990 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आजच्या घडीला सध्या 14 हजार 344 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच रुग्ण दुप्पटीचा दर 259 दिवसांवर गेला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या