• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • काँग्रेसला धक्का! ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांचं पुण्यात निधन

काँग्रेसला धक्का! ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांचं पुण्यात निधन

वरिष्ठ काँग्रेस नेते व विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस विचारधारेसाठी समर्पित एक सच्चा सेनानी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 • Share this:
  पुणे, 23 सप्टेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Senior Leader), विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. उद्या सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. अंत्यविधी कोरेगाव पार्क (भैरोबानाला) स्मशाभूमीत होणार आहे. (Congress Senior leader Sharad Ranapise passes away) वरिष्ठ काँग्रेस नेते व विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस विचारधारेसाठी समर्पित एक सच्चा सेनानी काळाच्या पडद्याआड गेल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेली चार ते पाच दिवस  शरद रणपिसे यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. दरम्यान, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Funeral at Koregaon Park (Bhairobanala) Cemetery) हे ही वाचा-ओबीसी आरक्षण अध्यादेशावर अखेर राज्यपालांची सही, राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा आ. शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि विधीमंडळात सहकारी म्हणून आम्ही एकत्र काम केले होते. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात त्यांची हातोटी होती. त्यांनी दीर्घ काळ काँग्रेस पक्ष व लोकांची सेवा केली. त्यांच्या अकस्मात निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
  Published by:Meenal Gangurde
  First published: