PM मोदींचं आहे पुण्यावर लक्ष! कोरोना विरुद्ध लढणारे कलेक्टर गेले थेट पंतप्रधान कार्यालयात

PM मोदींचं आहे पुण्यावर लक्ष! कोरोना विरुद्ध लढणारे कलेक्टर गेले थेट पंतप्रधान कार्यालयात

पुणे जिल्ह्यातून गेल्या काही वर्षात थेटपीएमओत प्रतिनियुक्तीवर जाणारे नवल किशोर राम हे तिसरे प्रशासकीय अधिकारी आहेत.

  • Share this:

पुणे 5 ऑगस्ट: पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांची थेट पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister Office) प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. गेली साडेचार महिने ते कोरोनाच्या महामारीत जिल्हा प्रशासनाचा गाडा यशस्वीपणे सांभाळत होते. खासकरून लॉकडाऊन सुरू असतानाही ससून रूग्णालयाची नवीन बिल्डिंग कोरोना आयसीयू स्पेशल वार्ड म्हणून कार्यान्वित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातून थेट पंतप्रधान कार्यालयात जाणारे नवल किशोर राम हे तिसरे अधिकारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थेट लक्षं पुण्यावर असल्याचं बोललं जात आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन अवघ्या दहा दिवसात ससुनची नवीन इमारत कोरोना स्पेशल हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करून घेतली होती.  त्यामुळे अनेक गंभीर कोरोना रूग्णावर वेळीच उपचार करणं शक्य झालं. एवढंच नाहीतर या कोरोना साथीमध्येही नवल किशोर राम यांनी नेहमीच फ्रंटलाईन वर राहून प्रशासकीय यंञणा चालवली त्यांच्या याच प्रशासकीय कौशल्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.

प्रशासकीय कौशल्याशी संबंधित एका सर्वेक्षणात नवल किशोर राम यांच्या पुणे प्रशासकीय पॅटर्नला नंबर वन रॅक मिळाला होता. केंद्रीय आरोग्य पथकानेही त्यांच्या कामाची प्रशंसा केली होती. कदाचित त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना थेट पीएमओत प्रतिनियुक्तीवर बोलावणं आल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोनाची साथ ऑगष्ट महिन्याअखेर नक्कीच आटोक्यात येईल, असा विश्वास मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे.

पुणेकरांसाठी 2 मोठ्या बातम्या; सर्व बंधनं उठणार, कपात टळणार

त्यांची आजच पीएमओ कार्यालयात उपसचिव पदावर प्रतिनियुक्तीवर निवड झाली, यानिमित्ताने नवल किशोर राम यांच्याशी 'न्यूज 18 लोकमत'शी खास संवाद साधला. ते म्हणाले,  'थेट पीएमओत प्रतिनियुक्ती होणं हा माझ्यासाठी नक्कीच बहुमान असला तरी प्रशासनात काम करताना लोकाभिमुख कारभार करणे हेच आमचं प्रथम कर्तव्य असतं ते मी यापुढेही करत राहिन'

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून गेल्या काही वर्षात थेट पीएमओत प्रतिनियुक्तीवर जाणारे नवल किशोर राम हे तिसरे प्रशासकीय अधिकारी आहेत. यापूर्वी श्रीकर परदेशी, कुणाल कुमार हे देखील पीएमओत रूजू झाले आहेत. आणि आता नवल किशोर राम यांचीही थेट पीएमओत प्रतिनियुक्ती झालीय.

गृहमंत्री अमित शहांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

श्रीकर परदेशी यांनी पीएमपीचा कारभार उत्तमरित्या सांभाळला होता तर कुणाल कुमार यांनी पुणे मनपा आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आता थेट पुणे कलेक्टर नवल किशोर राम यांचीच पीएमओत नियुक्ती झाल्याने पुणे प्रशासकीय वर्तुळात हा नवाच पीएमओ प्रतिनियुक्ती पॅटर्न तयार झाला असं बोललं जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 5, 2020, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading