पुण्यात लॉकडाऊन हटवणार,पण निर्बंध राहणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पुण्यात लॉकडाऊन हटवणार,पण निर्बंध राहणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

  • Share this:

पुणे, 23 जुलै: पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तर पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत.

हेही वाचा...मोठी बातमी! गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्यांना रहावे लागेल 14 दिवस क्वारंटाइन

तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर व्यायामासाठी मिळाली मुभा देण्यात आली आहेत.  सकाळी 5 ते 7 व्यायाम करता येणार आहे. मात्र, लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी, मैदानांवर गर्दी करता येणार नाही, व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. दुकाने P 1, P 2 प्रमाणे सुरू राहतील. तसेच खासगी कार्यालयात 15 टक्के किंवा 15जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करू शकतील, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती. तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत झपाट्यानं वाढ झाली. परिणामी आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात, हे दिसून आला. त्यामुळे बाजारपेठ आणि लग्न समारंभाबाबत प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु इतक्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि त्यात गटारी अमावस्येमुळे पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.

दरम्यान, पुण्यात लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसांत तब्बल 14109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, या दरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 484 रुग्णांना रुग्णालयातून डिचार्ज मिळाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 1514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा...चंद्रकांत पाटलांच्या नावानं 25 लाखांची खंडणी मागणाऱ्याला पुण्यात अटक

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरतेवर काय म्हणाले जिल्हाधिकारी...?

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता नक्कीच आहे. मात्र, बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण दगवाला, असं कुठं घडलं नाही. बेड उपलब्ध असून कुणी सेवा दिली नाही तर कारवाई केली जाईल, सर्व रुग्णालयाला त्या बाबत कळविण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: July 23, 2020, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading