मराठी बातम्या /बातम्या /पुणे /जेवणाच्या ताटावर भावासारखे जेवत होते दोन मित्र, पण एका शिवीमुळे...

जेवणाच्या ताटावर भावासारखे जेवत होते दोन मित्र, पण एका शिवीमुळे...


दीपक आणि प्रफुल्ल हे दोघे जण प्लांटमध्ये जेवण करीत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्ल याला अश्लिल शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दीपकला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

दीपक आणि प्रफुल्ल हे दोघे जण प्लांटमध्ये जेवण करीत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्ल याला अश्लिल शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दीपकला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

दीपक आणि प्रफुल्ल हे दोघे जण प्लांटमध्ये जेवण करीत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्ल याला अश्लिल शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दीपकला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

आळंदी, 11 ऑक्टोबर : अश्लिल शिवी दिली म्हणून चापट मारल्याचा राग मनात धरुन, मित्राने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना आळंदीमध्ये घडली आहे.  याप्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेड तालुक्यातील सोळू गावात घडली. प्रफुल्ल संपत गायकवाड (27, मुळ रा-आसु, ता फलटण, जि-सातारा) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र दीपक दिगंबर भिमटे (23, मुळ रा-मोतीबाग, भोलाईस्कुल जवळ नागपूर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी संतोष रामचंद्र निंबाळकर (42, रा. माळवाडी, गणेश मंदीर शेजारी, सोळु, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मध्यरात्री सोसायटीमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, LIVE VIDEO

फिर्यादी संतोष निंबाळकर यांचा सोळू गावात खटकाळी वस्ती इथं पाण्याच्या जारचा प्लांट आहे. त्यावर मागील आठ महिन्यांपासून आरोपी दीपक काम करत आहे. तो जार प्लांटच्या शेजारी त्याचा मित्र प्रफुल्ल याच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.

दीपक आणि प्रफुल्ल हे दोघे जण प्लांटमध्ये जेवण करीत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्ल याला अश्लिल शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दीपकला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून प्रफुल्ल हा पळून जात असताना दीपकने प्रफुल्ल याला पाठीमागून दगड मारला. हा दगड प्रफुल्लच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यावेळी दीपकने पुन्हा दगड उचलून प्रफुलच्या डोक्यात मारला. यात रक्तबंबाळ झाल्याने प्रफुल्लचा मृत्यू झाला.

200 कोरोना रुग्णांना पोहोचवलं रुग्णालयात, त्याच कोरोना योद्ध्याने गमावला जीव

प्रफुल्लचा मृत्यू झाल्यामुळे दीपकला हादरा बसला. त्यानंतर तो संतोष निंबाळकर यांच्या घरापुढे येऊन बसला. संतोष निंबाळकर हे घराबाहेर आले असता त्यांना प्रफुल्ल बाहेर बसल्याचं आढळून आले. त्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता दीपकचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर संतोष यांनी आळंदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रफुल्लला ताब्यात घेतले. दीपकचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी प्रफुल्लवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आळंदी पोलीस करत आहे.

First published:

Tags: Pune