Home /News /pune /

चंदगड बँकेत 7 कोटींचा घोटाळा, पुण्यात संतप्त खातेदारांनी केली तोडफोड

चंदगड बँकेत 7 कोटींचा घोटाळा, पुण्यात संतप्त खातेदारांनी केली तोडफोड

खातेदारांकडून त्याने अंदाजे 20 ते 40 हजार वसूल करून संचालक विठ्ठल पेडणेकर पळून गेल्याचा आरोप होतोय.

पुणे 07 जानेवारी : पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेनं लाखोंच्या कर्जाचं अमिष दाखवून गरजू खातेदारांना तब्बल 7 कोटींना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येतात पीडित गुंतवणूकदारांनी पुण्यातलं या बँकेचं कार्यालयच फोडलंय. पुण्याच्या केके मार्केट संकुलातलं चंदगड अर्बन निधी बँकेचं ऑफिस सध्या बंद पडलंय. घोटाळा बाहेर आल्याने बँकेसमोर खातेदार जमले असून त्यांनी बँकेच्या कार्यालयातच राडा घातलाय. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हे सर्व खातेदार चिडलेत... पण बँक संचालक विठ्ठल पेडणेकर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय. कर्ज मिळण्याच्या आशेपोटी या खातेदारांनी व्याजाने पैसे काढून बँकेची कर्ज पॉलिसी काढलीय. प्रत्येकाकडून अंदाजे 20 ते 40 हजार वसूल करून संचालक विठ्ठल पेडणेकर पळून गेल्याचा आरोप होतोय. कोल्हापुरातही त्याने अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी केलीय. या आधी पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा झाला होता. त्यात शेकडो खातेदारांची कोट्यवधींशी फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातल्या या बँकेचा घोटाळा उघडकीस असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून तातडीने कारवाईची मागणी होतेय. पुण्यातही राष्ट्रवादीचा राडा, ABVPच्या कार्यालयाला फासलं काळं पंजाब नॅशनल बँकेत नेमकं काय झालं? नीरव मोदी हा देशातील बड्या नेत्यांच्या वर्तुळात फिरणारा एक मोठा हिरा व्यापारी, त्यामुळे बँकांकडूनही त्याला नेहमीच रेड कार्पेट ट्रिटमेंट मिळायची, याचाच गैरफायदा घेत त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'ची सुविधा मिळवली.  ही 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' नेमकी काय भानगड आहे ? तर लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे एक एका बँकेकडून दुसऱ्या बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी दिली जाणारी पतहमीच होय.

देवेंद्र फडणवीसांचा जयंत पाटलांवर पलटवार, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये 'सोशल वॉर'

म्हणजे समजा संबंधीत कर्जदाराने त्या बँकांची कर्ज बुडवली तर लेटर ऑफ अंडरटेकिंग देणाऱ्या बँकेनं ती रक्कम चुकती करणं अपेक्षित असतं पण त्यासाठी ही पतहमी देणारी बँक संबंधीत खातेदाराकडून ठराविक अनामत रक्कमही स्वतःकडे ठेऊन घेत असते. थोडक्यात याच पतहमीच्या म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या जोरावर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी त्यांच्या नावावरील डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस या तीन कंपन्यांसाठी हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले आणि 11 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेने बँकेला बुडवलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या