मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : पाळत ठेवण्यासाठी सुनेच्या बेडरूममध्ये लावला CCTV; सासू, सासरा आणि नणंदेचं भयंकर कृत्य

Pune : पाळत ठेवण्यासाठी सुनेच्या बेडरूममध्ये लावला CCTV; सासू, सासरा आणि नणंदेचं भयंकर कृत्य

ही घटना पुण्यातील असून तीन वर्षांपासून सासू, सासरे आणि नणंद सुनेच्या बेडरूममधील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होते. या प्रकरणात त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
पुणे, 9 ऑक्टोबर : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे सुनेवरील संशयावरुन बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV camera in the Daughter in laws bedroom ) लावण्यात आला होता. या प्रकरणी सासरा, सासू आणि नणंद यांना कोर्टाने (Court) अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी या तिघांनी न्यायालयात अर्ज केला होता. (Pune CCTV installed in daughter in laws bedroom for surveillance Terrible act of mother in law father in law and Nanand) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चिंचवड येथे (Chinchwad News) जुलै 2018 ते ऑगस्ट 2021 यादरम्यान घडली आहे. या सीसीटीव्हीमध्ये पतीच्या बहिणीच्या नवऱ्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 28 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पीडितेचा नवरा, सासरा, सासू, नणंद आणि नणंदेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याअंतर्गत बलात्कार, विवाहितेचा छळ आणि धमकाविण्यासह गुन्हे नोंदविण्यात आले आहे. हे ही वाचा-...तुम्हाला काम देतो' सांगत डोंगरावर नेऊन महिलेसोबत भयावह कृत्य; पुण्यातील घटना या प्रकरणातील पती आणि नणंदेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. तर तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र पीडित महिलेचा पती आणि नणंदेच्या पतीची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला आहे. त्यातही केवळ संशयावरुन तिच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावल्याचा प्रकार पुण्यातील पिंपरी येथे घडला आहे.
First published:

Tags: Cctv, Crime news, Pune

पुढील बातम्या