पुण्यात गुन्हेगारांचा हैदोस! पूर्ववैमनस्यातून गाड्यांची तोडफोड

पुण्यात गुन्हेगारांचा हैदोस! पूर्ववैमनस्यातून गाड्यांची तोडफोड

बिबवेवाडी परिसरात काही अज्ञातांना चारचाकी गाड्यांची तुफान तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

  • Share this:

पुणे, 13 जानेवारी : पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांची जाळपोळ केल्याची घटना नुकतीच ताजी असताना पुण्यात गुंडांनी हैदोस घातला आहे. बिबवेवाडी परिसरात काही अज्ञातांना चारचाकी गाड्यांची तुफान तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात शिवशंकर आणि निलकमल सोसायटीमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या चारचाकी गाड्या असल्याची माहिती मिळाली आहे.तर पूर्ववैमनस्यातून ही तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. पिंपरी-चिंचवडनंतर आता बिबवेवाडीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडीओच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात गुन्हेगारांचा तपास सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये जाळल्या 10 गाड्या

पिंपरी चिंचवडमध्ये ओम गणेश सोसायटीमध्ये सर्व झोपले असताना रात्री उशिरा एक तरुण शिरला त्यानं तिथे पार्क केलेल्या गाड्यांना आग लावली आणि पळ काढल्या. यामध्ये आगीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 10 गाड्या जळून गेल्यानं मोठा संताप व्यक्त केला जात आहे. गाड्यांना आग लावणारा तरुण सोसायटीला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे कृत्य करताना कैद झाल्यानं खळबळ उडाली आहे.

हे वाचा-भर बाजारात इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या!

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीला उद्योगनगरीत गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड केली होती. तर मागच्या वर्षी 2020मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांकडे दाखल असलेल्या आकडेवारी नुसार मागील वर्षभरात गुंडांनी केलेल्या तोडफोडीत सुमारे 348 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असल्यानं दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तर ओम गणेश सोसायटीमध्ये घडलेल्या प्रकरणात आरोपीविरोधात पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

First published: January 13, 2021, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading