मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Canal Drowned Boy : चिमुकले मित्र कालव्याजवळ खेळत होते, अचानक एकाचा पाय घसरला अन्… पुण्यातील दुर्देवी घटना

Pune Canal Drowned Boy : चिमुकले मित्र कालव्याजवळ खेळत होते, अचानक एकाचा पाय घसरला अन्… पुण्यातील दुर्देवी घटना

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा कालव्यातील वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा कालव्यातील वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा कालव्यातील वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 03 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा कालव्यातील वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आरव झोडगे (वय 06) असं मृत मुलाचे नाव असून मित्रा सोबत कालव्याजवळ खेळत असताना आरवचा पाय घसरून कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल दिवसभर मृतदेह सापडला नाही. दरम्यान शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती यावेळी मृतदेह शोधण्यात आला. या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव येथे डिंभे धरणाचा उजवा कालवा गेला आहे. या कालव्यात काही मुले पोहायला जात असतात. दरम्यान काल एक 06 वर्षीय मुलगा मित्रासोबत कालव्याजवळ खेळायला गेला होता. यादरम्यान मुलाचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडाल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा : मुलानेच जन्मदात्याला संपवलं, डोक्यात सपासप वार; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी भरपूर असल्याने वाहत्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरव झोडगे असं मृत मुलाचे नाव आहे. मुलाचा मृतदेह शोधण्यास यश आले आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आंबेगाव घोडेगाव येथील आरव समीर झोडगे हा मित्रासोबत खेळायला गेला होता. तो परत का आला नाही याचा शोध घेतल्यास त्याचा मृतदेह आढळून आला. 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घोडेगावजवळ डिंभे धरण उजव्या कालव्यात थेट मृतदेहच आढळून आला.

घोडेगाव जवळील इनामवस्ती येथे सागर भास्कर यांच्या घराशेजारून गेलेल्या कालव्या जवळून आरव झोडगे हा लहान मुलगा बेपत्ता झाला होता. हा मुलगा कालव्याजवळ खेळत होता. याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस आणि स्थानिक लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्याचा तपास लागू शकला नाही.

हे ही वाचा : प्रेम पडलं महागात, प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ केले व्हायरल

शेवटी तो कालव्यात पडल्याचा अंदाज सर्वांना आला. यावरून कुकडी पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर परत कालव्याच्या कडेने त्याचा शोध घेण्यात आला. फेब्रुवारी जानेवारी रोजी रात्री 1 च्या सुमारास त्याचा मृतदेह कालव्यामध्ये मिळून आला. आरवचा शोध घेण्यासाठी आपदा मित्र, पोलीस तसेच घोडेगाव, चास, नारोडी येथील अनेक तरुण त्याचा शोध घेत होते. या घटनेमुळे घोडेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

First published:

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune police