बुलेटवर नवरीचा SWAG, आर्चीलाही विसराल अशी रिअल लाईफ 'बुलेट राणी'

शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाह स्थळापर्यंत बुलेटवरून तिची हौस पूर्ण केली आहे.

  • Share this:

नवरदेवाची  एन्ट्री, आपण  घोड्यावरून, हत्तीवरून, आलीशान  कारमधून किंवा मग हेलिकॉप्टरमधून पाहिली असेल. पण पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या केडगाव इथं मात्र शेतकऱ्याच्या मुलीची वरात पाहून तुम्ही थक्क व्हाल.

केडगावमधील शहाजी देशमुख यांच्या मुलीचा आर्यन लॉन्स इथं बुधवारी विवाह संपन्न झाला.   सकाळपासूनच  मित्र परिवार आणि पाहुणेरावळी  लग्नासाठी जमा झाले. आणि प्रतिक्षा होती ती नव-वधुची

बॅन्ड-बाजा आला पण नवरी मुलगी काही दिसेना. पण गर्दीतून तो बुलेटचा आवाज आणि त्यावर नववधू चक्क फेटा बांधून, गॉगल लाऊन लग्न मंडपात दाखल झाली.

मग काय, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मुलगी म्हटलं की सतत लाजर मुरडत बसायचं असं काहीस चित्र लग्नात असतं. पण या भन्नाट नवरीबाईचा SWAG पाहून सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली.

पण मंडळी, हे करण्यामागे हेतूही तितकाच खास होता. मुलगी झाली म्हणून तिचा जन्मताच गळा आवळणाऱ्या लोकांना झोपेतून जागं करण्यासाठी हे केलं असल्याचं शहाजी देशमुख म्हणातात.

मुलींविषयी असणारे सर्व  गैरसमज दुर करत शहाजी देशमुख यांनी आपल्या मुलीची हौस पूर्ण  केली.

यातून मुलगी म्हणजे खरी लक्ष्मी आहे असा संदेश त्यांनी लोकांना दिला.

या नवरीचे फोटो पाहिल्यानंतर आतापर्यंत सैराट सिनेमातल्या आर्चीची बुलेटवरची एन्ट्री तुम्हाला आठलीच असेल. अर्चीच्या बुलेटची जशी चर्चा झाली तशीच चर्चा आता या बुलेटचीसुद्धा सुरू आहे.

कोमल देशमुख असं नव-वधुचं नाव आहे. 'मुलाप्रमाणे माझ्या बाबांनी मला सांभाळलं. माझे सगळे हट्ट त्यांनी पुरवले. त्यामुळे लग्नाच्या मंडपात बुलेटवर येण्याचा हट्टही माझ्या बाबांनी पुरवला' असं कोमल म्हणाली.

कर्जाच्या ओझ्याखाली अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करताना आपण पाहिलं आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या करणारा बापही आपण पाहिला. आणि मुलीच्या लग्नापाई एखाद्याकडे लाचार होणारा बाबाही आपण सगळ्यांनी पाहिला. हाच बाप आज या लग्नकार्यातून पुन्हा पाहायला मिळाला असं म्हणायला हरकत नाही.

मंडळी, हुंड्यापाई पत्नीला मारहाण केल्याच्या बातम्या आपण सतत वाचतो. पण आपल्या पत्नीची अशी भन्नाट इच्छा पुर्ण करणारा पती या लग्नातून समोर आला.

मुलगी नको म्हणून तिला मारूण टाकणाऱ्या पालकांसाठी ही कहानी एक धडा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 12:43 PM IST

ताज्या बातम्या