Home /News /pune /

पुण्यात म्हैस उधळली! रस्त्यावरुन जाणाऱ्याला दुचाकीला धडकली, पती-पत्नी जखमी, घटना CCTV मध्ये कैद

पुण्यात म्हैस उधळली! रस्त्यावरुन जाणाऱ्याला दुचाकीला धडकली, पती-पत्नी जखमी, घटना CCTV मध्ये कैद

Pune: पुण्यातील कॅम्प परिसरात म्हशीने दुचाकीला धडक दिली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पुणे, 26 ऑगस्ट : पुण्यात रस्त्यावरुन जाणारी म्हैस (Buffalo) अचानक उधळली आणि त्यानंतर थेट दुचाकीला धडक (Buffalo hits biker) दिल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात (Pune Camp area) ही घटना घडली असून या म्हशीने रस्त्यावरील दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी (Husband wife injured) झाले आहेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. घटनेचा सीसीटीव्ही VIDEO कॅम्प परिसरात 8 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी साधारणतः पावणे चार वाजण्याच्या सुमारास काही महिला दुकानात प्रवेश करत होत्या तर कुणी दुचाकीवरुन जात होते. त्याच दरम्यान म्हैस रस्त्यावरुन जात होत्या आणि त्यापैकी एक म्हैस उधळली. म्हैस उधळून थेट समोरुन येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert सीसीटीव्हीत आपण पाहू शकतो की, उधळलेल्या म्हशीने दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती आणि पत्नी जखमी झाले आहेत. दुचाकी चालक जुबेर शेख हे पत्नीसोबत जात असताना वरशी मस्जिद जवळ ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना अटक सुद्धा केली आहे. ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv, Pune

पुढील बातम्या