पुणे, 6 सप्टेंबर: कोरोना पाठोपाठ लॉकडाऊन आणि पाचवीला पुजलेल्या हेटाळणीच्या नजरा या सगळ्यांबरोबर आयुष्य कसं जगायचं असा प्रश्न आहे. अनलॉक झाल्यानंतर कधीतरी येणार गिऱ्हाईक त्याच्यासोबत कोरोना येण्याची भीती अशा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे पुण्यातील 'ती' गल्ली. तरीही सामाजिक अंतर, सॅनेटायझर आणि सुरक्षेच्या सगळ्या उपायोजना करून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचा देहविक्री व्यवसाय सुरू झाला आहे.
हेही वाचा...शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO
अनलॉक झाल्यानंतर पुण्यातल्या देहविक्री करणाऱ्या वस्तीमध्ये भिरभिरत्या नजरा घेऊन फिरणारे पुरुष आताशा दिसायला लागले आहेत. पूर्वीसारखा धंदा नाही, नेहमी येणारे गिऱ्हाईक कोरोनाच्या भीतीनं येईना झाले आहेत. पण तरीही जे येत आहेत त्यांना पूर्ण खबरदारी घेऊनच शरीर संबंध ठेऊ दिले जात आहेत.
इथे कुणाशी ही बोलायची सोय नाही. परिसर दिसायला अत्यंत गलिच्छ, अरुंद गल्ल्या, श्वास घेता येणार नाहीत, अशा खोल्या आणि त्यात पोटाची खळगी भरण्यासाठी कराकर वाजणारे जुने लाकडी पलंग.. तिथल्या घाणी मुळेच कोरोना जास्त पसरतो असा पांढरपेशा समाजाचा समज आहे. त्यामुळे इथल्या देहविक्री करणाऱ्या महिला खबरदारी घेत आहेत.
सध्या करण्याच्या परिस्थितीत गेले सहा महिने कुठला धंदा नाही. लॉकडाऊनमध्ये उरलेसुरलेली बचत संपली आहे. आता गरज आहे रोख रकमेच्या मदतीची. इथल्या महिला कर्जबाजारी झाल्या आहेत. समाजाचा एक घटक म्हणून सरकारनं त्यांच्याकडे संवेदनशिलतेने पाहण्याची गरज असल्याचं सहेली संस्थेच्या सेवेकरी तेजस्वी यांनी सांगितलं.
हेही वाचा...इलेक्ट्रिक DPचा स्फोट, उष्ण ऑईलमुळे होरपळून 4 महिन्यांच्या नातीसह आजीचा मृत्यू
व्यवसाय प्रशासन सगळ्यांच्या दृष्टीनंही गल्ली हा केवळ हेटाळणीचा विषय ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये. केवळ अपेक्षाभंग याच्या अनुभवाशिवाय दुसरं काहीही यांच्या वाटेला आलं नाही. तरीही यांचे व्यावहारिक शहाणपण एवढं की गेल्या सहा महिन्यांत इथे एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. अडचणीच्या काळातही या महिलांकडून सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अगदी काटेकोरपणे पालन झालं आहे. आता पुढची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं या महिलांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.