मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आईच्या हातच्या खिरीची कमाल; पुण्यातील बहीण-भाऊ बनले कोट्यधीश

आईच्या हातच्या खिरीची कमाल; पुण्यातील बहीण-भाऊ बनले कोट्यधीश

फोटो सौजन्य - The better india

फोटो सौजन्य - The better india

पुण्यातील बहीण-भावाच्या आईच्या हातच्या खिरीची चव फक्त पुण्यातच नाही तर देशभरात पोहोचली आहे.

पुणे, 26 जानेवारी : आईच्या हातच्या पदार्थांना तशी तोड नसतेच. कितीही महागड्या हॉटेल्समध्ये गेलात तरी तिथल्या पदार्थांना आईच्या हातची चव नसते. कारण आईनं बनवलेल्या पदार्थांमध्ये फक्त सामग्रीच नाही तर तिचं प्रेमही असतं आणि अशीच आईच्या हातची खीर विकून पुण्यातील बहीण-भाऊ कोट्यधीश झाले आहेत. पुण्यातील La Kheer Deli (LKD) ची खीर फक्त पुण्यातच नाही तर देशभर लोकप्रिय आहे.

पुण्यातील शिवांग आणि शिविका सूद यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजे  2019 मध्ये   La Kheer Deli (LKD)  सुरू केलं. जिथं न्यूटेला, ब्राऊनी, चॉकलेट, ओरिओ, गुलकंद अशा वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या खीर चाखायला मिळतात. या सर्व खीर आईच्या हातच्या बनलेल्या आहेत बरं आहे. शिवांग आणि शिविकाची आई सोनिया सूद स्वत: ही खीर बनवतात.

'द बेटर इंडिया'शी बोलताना 27 वर्षांचा शिवांग म्हणाला, "आम्ही लहान असताना आई खीर बनवायची. आईच्या हातची खीर संपूर्ण कुटुंबं मोठ्या प्रेमानं आणि आवडीनं खायचं. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये माझी बहिण या खिरीला कंटाळली. मग तिनं आपल्या खिरीमध्ये चमचाभर न्यूटेला आणि ओरिओ टाकलं. यामुळे खिरीची चव बदलली आणि तिनं आईला सांगितलं.

शिवांग आणि शिविकाच्या आईनं हा वेगळा प्रयोगही करून पाहिला. ती वेगवेगळ्या फ्लेव्हर्सनं खीर बनवू लागली. तिनं गुलकंद आणि ब्राऊनी घालूनही खीर बनवली आणि ती सर्वांनाच आवडली.

हे वाचा - फक्त चॉकलेट खा आणि लाखो रुपये कमवा; तुमच्यासाठी हटके जॉबची ऑफर

शिवांग सांगतो, "सुरुवातीला मी स्पोर्ट्स स्टार्टअप चालवायचो. मग ही खीर इतरांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना माझ्या आणि शिविकाच्या डोक्यात आली. पण पैशांचा प्रशिन होताच. पण 19 मे, 2017 मध्ये आम्ही गुंतवणूक केली. पुण्याच्या औंधमध्ये 'स्टारबक्स'च्या बाहेर गाडीवर आईने बनवलेली वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची खीर विकायला सुरुवात केली"

मित्रांच्या मदतीनं सुरुवातीला खिरीचे 44, नंतर 82 डब्बे आणि मग 100 डब्बे  खिरीची विक्री झाली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग आणइ ब्रँडिंग सुरू झालं, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लोक प्री-ऑर्डर देऊ लागले. असं शिवांगनं सांगितलं. खिरीची चांगली विक्री होऊ लागल्यानं मग त्यांनी दुकानचं सुरू केलं. 2018 मध्ये पुण्याच्या जेएम रोडवर दुकान टाकलं. सुरुवातीली खीर विक्रीतून त्यांची कमाई  33 लाख रुपये होत होती. जी 2018 मध्ये 84 लाख आणि 2019-2020 मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

हे वाचा - मृत्यूशी लढतेय 5 महिन्यांची तीरा कामत; 16 कोटींचं इंजेक्शन दिलं तरच वाचेल जीव!

शिवांग आणि शिविकानं हा बिझनेस सुरू केला असला तरी त्यांच्या आईनं या बिझनेससाठी शाळेतील शिक्षिकेची नोकरीही सोडली आहे आणि आता व्यवसायात इतकी भरभराट आहे की त्यांना याची अजिबात खंत वाटत नाही.

First published:
top videos

    Tags: Career, Food, Pune, Pune news