पुणे: ब्रेकअपनंतर प्रियकर भडकला; प्रेयसीला घाबरवण्यासाठी हॉस्टेलबाहेर झाडल्या गोळ्या

पुणे: ब्रेकअपनंतर प्रियकर भडकला; प्रेयसीला घाबरवण्यासाठी हॉस्टेलबाहेर झाडल्या गोळ्या

ब्रेकअप झाल्यामुळे प्रियकर चिडला होता. त्यावर प्रेयसीला घाबरवण्यासाठी त्याने तिच्या हॉस्टेलबाहेर जाऊन गोळीबार केला.

  • Share this:

पुणे, 05 फेब्रुवारी : शाहरुख खानचा 'डर' हा सिनेमा तुम्हा सगळ्यांनाच आठवत असेलच. या सिनेमात शाहरुख प्रेयसीला घाबरवत असतो. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात चतुर्शृंगी भागात घडला आहे. प्रेम प्रकरणातून तरुणाने हवेत गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या हॉस्टेल बाहेर हा प्रकार घडला आहे.

ब्रेकअप झाल्यामुळे प्रियकर चिडला होता. त्यावर प्रेयसीला घाबरवण्यासाठी त्याने तिच्या हॉस्टेलबाहेर जाऊन गोळीबार केला. गेल्या काही दिवसांआधीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे प्रियकर प्रचंड चिडला होता.

तरुणाने फक्त हवेत गोळीबारच नाही तर त्यानंतर त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतुर्शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. या तरुणाकडे बंदूक आलीच कशी याचाही आता पोलीस तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने तख्त गाठला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पोलिसांचा धाक उरला नाही का ? असा सवाल उपस्थित होतो.

पिंपरीत रक्ताची सकाळ, सराईत गुन्हेगार सुनील आरडेची निर्घृण हत्या

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिचंवड म्हणजे गुन्ह्यांची नगरी झाली आहे. कारण सोमवारी रात्रीच्या सुमारास पिंपरी-दापोडीमध्ये अज्ञात टोळक्याकडून सराईत गुन्हेगार सुनील आरडेची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सकाळ ही पिंपरीकरांसाठी धक्कादायक होती.

अज्ञात टोळक्यांनी सुनील आरडेची निर्घृण हत्या केली आहे. दगडाने ठेचून त्याला मारण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. अनिकते चांदणे असं जखमीचं नाव आहे. तो सुनीलचा साथीदार आहे.

पूर्ववैमनस्यातून प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार त्यांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहेत. तर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पिंपरीत होणाऱ्या अशा खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून सुनीलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस घटनास्थळी संशयास्पद वस्तूंचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत.

VIDEO: नवऱ्याने 'त्या' अवस्थेत रंगेहात पकडलं पत्नीला, बांबूने केला प्रियकराचा मर्डर

 

First published: February 5, 2019, 10:13 AM IST
Tags: crimepune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading