पुण्यात अघोरी प्रथेचा कहर, नग्न पूजा करत महिलांच्या शरीरावर चोळायचा लिंबू

पुण्यात अघोरी प्रथेचा कहर, नग्न पूजा करत महिलांच्या शरीरावर चोळायचा लिंबू

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींच्या योनीमार्गात सुपारी ठेऊन त्यांना कुणाला सांगितल तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा खुलासाही पोलीस तपासात करण्यात आला आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड (पुणे), 25 फेब्रुवारी : पुण्यात घडलेल्या अघोरी प्रथेच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला. पूजेच्या नावाखाळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात धेतलं आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरावर लिंबू पिळून चोळणं असं धक्कादायक प्रकार तो करायचे अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींच्या योनीमार्गात सुपारी ठेऊन त्यांना कुणाला सांगितल तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा खुलासाही पोलीस तपासात करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाकडून 3 लाख 11 हजार रूपये अघोरी पूजेच्या नावाखाली उकळले आहेत. तुमच्या घरातमध्ये पुत्रप्रात्पी होऊ नये यासाठी तुमच्याच एका नात्यातील बाईने करणी केली आहे असं सांगून पीडित कुटुंबियांना भुरळ पाडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ चव्हाणने कुटुंबातील एका तरुणीशी लग्न केल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर महिलांना नग्न करून त्यांच्या छातीवर लिंबाचा रस चोळयचा. त्यानंतर त्यांच्या योनीला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करत जिभेने चाटायचा असंशी माहितीही पीडितेने पोलिसांना दिली आहे.

अल्पवयीन मुलींच्या योनीमध्ये सुपारी ठेवायचा आणि हा सगळा प्रकार करताना तो कोणाशीतरी बोलण्याचे नाटक करायचा आणि त्या लहान आहेत त्यांना मारू नको. सोड निघून जा असं ओरडायचा. हा सगळ्या प्रकार पीडित कुटुंबाने पोलिसांसमोर उघड केला आहे.

घरात गुप्तधन असल्याचं आणि मुलगा होणासाठी अघोरी पूजा करायला लागेल असं सांगून भोंदू बाबाकडून एकाच घरातील पाच महिलांच लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सोमनाथ चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तुमच्या घराच्या एका खोलीमध्ये गुप्तधन आहे. त्यामध्ये आत 7 पेट्या धन, एक सोन्याची घागर आणि एक गणपतीची मुर्ती असा खजिना असल्याचं सांगितलं. तुमच्या घरातील मनाली नावाच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला पुत्र हवा असेल, मनालीचा जीव वाचवायचा असेल आणि खजिना हवा असेल तर घरात उतारा टाकावा लागेल आणि नग्न पूजा करावी लागेल असं या नराधम भोंदू बाबाने पीडित कुटुंबियांना सांगितलं.

या सगळ्या विधीसाठी 3 लाख खर्च आणि माझी 11 हजार रुपये दक्षिणा द्यावी लागले. पुढच्या 15 दिवसांत उतारा टाकला नाही तर घरातील सदस्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत आरोपी सोमनाथ चव्हाणने कुटुंबाला घाबरवलं. अशा प्रकार अंधश्रद्धेची भीती घातल्यामुळे कुटुंबीय अघोरी विद्या करण्यासाठी तयार झाले.

पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी घरातील सोनं विकलं आणि आरोपी सोमनाथला पैसे दिले. त्यानंतर 20 दिवसांनी घरी येत सोमनाथने एक काळी कोंबडी, बाहुल्या, टाचण्या, पांढरे कापड, मीठ, लिंबू, कोहळा आणि खूप सामान घेऊन आला. त्यानंतर त्याने प्रत्येकावर उतारा टाकण्यास सुरुवात केली. सगळ्यांच्या अंगावरील कपडे त्याने काढून स्वत:कडे ठेवले. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण आहे.

First published: February 25, 2020, 1:42 PM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading