पुणे: घरगुती गणेश विसर्जनावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने

पुणे: घरगुती गणेश विसर्जनावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने

'विसर्जनासाठी एका मूर्तीसाठी प्रत्येकी चार लोक जरी धरले तरी तब्बल 20 लाख पुणेकर घराबाहेर पडतील, त्यात सोशल डिस्टंन्सिंग पाळणं शक्य नाही.'

  • Share this:

पुणे 10 ऑगस्ट: पुण्यात घरगुती गणेश विसर्जनावरून पुणे मनपात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांनी घरातच गणेश विसर्जन करण्याचं आवाहन केलं आहे. तर काँग्रेसनं त्याला विरोध दर्शवलाय. त्यामुळे पुण्यातला सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. पुण्यात तब्बल 4 लाख घरगुती गणपती बसतात.

एवढ्या गणेश भक्तांनी घरातच नेमकं कसं विसर्जन करायचं असा सवाल काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सव हा शेवटी धार्मिक विषय असल्याने तो तितक्याच संवेदनशीलपणे हाताळला जावा, अशी अपेक्षा आबा बागुल यांनी  व्यक्त केली.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महापालिकेनं सोशल डिस्टंन्सिंग पाळून पुणेकरांना नदीत, कॅनॉलमध्ये किंवा हौदात गणेश विसर्जन करू द्यावं, अशी भूमिका बागुल यांनी मांडलीय आहे.

कोविडचा आढावा घेण्यासाठी बैठक, उपमुख्यमंत्री बोलत असतांनाच नाकातून आलं रक्त

आबा बागुलांचा हा प्रस्ताव महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावलाय, पुण्यात दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला किमान 5 लाख मूर्ती विसर्जित होतात. यावर्षी मात्र कोरोना महामारीमुळे गणपतीच्या खुल्या विसर्जनाला परवानगी शक्य नाही, कारण असं केलं तर विसर्जनासाठी एका मूर्तीसाठी प्रत्येकी चार लोक जरी धरले तरी तब्बल 20 लाख पुणेकर घराबाहेर पडतील, सोशल डिस्टंन्सिंग पाळणं केवळ अशक्य बनून जाईल, असं गणितच महापौरांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना मांडलंय.

FACT CHECK: लोकल, मेल आणि एक्सप्रेस सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार?

त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षात असलेला काँग्रेस पक्ष आता ऐकमेकांविरोधात आला आहे. या प्रश्नावर प्रत्यक्ष पालिका सभागृहात हे पक्ष नेमकी काय भूमिका घेतात हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 10, 2020, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading