Home /News /pune /

पुणे भाजपकडून भास्कर जाधवांच्या पोस्टरला ‘जोडे मारो’, पूरग्रस्तांवर अरेरावी केल्याचा निषेध

पुणे भाजपकडून भास्कर जाधवांच्या पोस्टरला ‘जोडे मारो’, पूरग्रस्तांवर अरेरावी केल्याचा निषेध

चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणाऱ्या पूरग्रस्तांना शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दमदाटी केल्याचा निषेध करत पुणे भाजपनं (Pune BJP) त्यांचा निषेध केलाय. पुण्यात त्यांच्या पोस्टरला जोडे मारून भाजपनं त्यांचा निषेध केला.

पुढे वाचा ...
पुणे, 26 जुलै: महाराष्ट्रातील विविध भागात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. कोकणातील पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची (Flood Victims) विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) रविवारी चिपळूणला (Chiplun) गेले होते. चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणाऱ्या पूरग्रस्तांना शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दमदाटी केल्याचा निषेध करत पुणे भाजपनं (Pune BJP) त्यांचा निषेध केलाय. पुण्यात त्यांच्या पोस्टरला जोडे मारून भाजपनं त्यांचा निषेध केला. चिपळूणमध्ये काय घडलं? चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अनेक व्यापारी त्यांच्याकडे आपली कैफियत मांडत होते. त्यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर मदतीसाठी टाहो फोडत मदत करण्याची विनंती केली. नेते येतात, आश्वासनं देतात आणि निघून जातात असं म्हणत मदत दिल्याशिवाय तुम्ही जाऊच नका, अशी मागणी तिनं मुख्यमंत्र्यांकडे केली. भावूक झालेल्या या महिलेचं म्हणणं मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे इतर सर्वजण ऐकून घेत होते. मुख्यमंत्री तिला मदतीचं आश्वासनही देत होते. मात्र भास्कर जाधव यांनी त्या महिलेच्या मुलाला दमदाटी करत आपल्या आईला नीट समजावून सांगण्याची ताकीद दिली. दुसऱ्या दिवशी आपल्या बंगल्यावर येण्याचं फर्मानही त्यांनी सोडलं. एवढी अरेरावी कशासाठी? ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं, ते मदतीची याचना करत असताना त्यांच्यावर अरेरावी कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जनतेच्या समस्या समजून न घेता त्यांच्या अंगावर जाणे चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली आहे. आपत्ती व्यवस्थापनात सरकार सपशेल अपयशी ठरलं असून सत्ताधारी पक्षाचे आमदार करत असलेली अरेरावी निषेधार्ह असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. हे वाचा -राज कुंद्रा कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर दौऱ्यापेक्षा अरेरावीचीच चर्चा मुख्यमंत्र्यांनी कोकणात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेतली असली, तरी भास्कर जाधवांच्या अरेरावीचाच मुद्दा दिवसभर चर्चेत राहिला. भाजपनंही याच मुद्द्यावरून जोरदार टीका सुरू केली असून पुण्यात भास्कर जाधवांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
Published by:desk news
First published:

Tags: Bhaskar jadhav, BJP, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या