कात्रजमध्ये फायनान्स कंपनीच्या गोडावूनला आग, 50 दुचाकी जळून खाक

कात्रजमध्ये फायनान्स कंपनीच्या गोडावूनला आग, 50 दुचाकी जळून खाक

  • Share this:

17 एप्रिल :  पुण्यातील कात्रज भागातील मांगडेवाडी येथील फायनान्स कंपनीच्या गोडावूनला लागलेल्या आगीत जवळपास ५० दुचाकी वाहन आणि तीनं गोडावून अक्षरश जळून खाक झाले.

शॉर्ट सर्किट मुळे गोडावून लागलेल्या आगीत दुचाकी वाहन आणि गोडावून जळूनं खाक झाली आहेत. जळालेली सर्व वाहन ही हिंदुजा फायनास कंपनीची आहेत.  हप्ते न भरणाऱ्या ग्राहकांकडून ओढून आणलेली दुचाकी वाहनं हिंदुजा फायनास कंपनीने विजय इंटरप्रायजेस नावाच्या गोडावून मध्ये लावल्या होत्या. मात्र गोडावूनच्या बाजूने जाणाऱ्या इलेक्ट्रिक वायर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे दुचाकी वाहन आणि गोडावून जळून खाक झालं आहे.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी लवकरच दाखल झाल्या होत्या मात्र एमएसईबी कडून विद्युत पुरवठा खंडित करण्या साठी दिरंगाई झाल्या मुळे आगीने आणखी मोठं रुद्ररूप धारण केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2017 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading