मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मोठी बातमी : सिने अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा आणि भाजपचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी याला अटक

मोठी बातमी : सिने अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा आणि भाजपचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी याला अटक

भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी (Rohan Mankani arrested) याला सायबर सेलने अटक केली आहे.

भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी (Rohan Mankani arrested) याला सायबर सेलने अटक केली आहे.

भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी (Rohan Mankani arrested) याला सायबर सेलने अटक केली आहे.

पुणे, 16 मार्च : प्रसिद्ध सिने अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा (Actor Ravindra Mankani's Son) आणि भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी (Rohan Mankani arrested) याला सायबर सेलने अटक केली आहे. मंकणी याच्यासह एका महिला आणि इतर 7 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकेच्या खात्यांची माहिती चोरून विकण्याच्या प्रयत्नात ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्क्रीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह 8 जणांना अटक केली आहे. भाजपचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा पुत्र रोहन मंकणीचाही त्यात समावेश आहे.

रोहन रवींद्र मंकणी (वय 37, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय 54, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय 34, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय 34, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय 37, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय 34, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय 45, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय 42, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय 40, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, बँक खात्यांची माहिती चोरल्याप्रकरणी भाजपच्या चित्रपट आघाडीच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मुद्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याचीही शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Pune crime, Pune news