Home /News /pune /

Pune Bibwewadi Murder Case: कबड्डीपटूची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Bibwewadi Murder Case: कबड्डीपटूची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Bibwewadi Murder Case: कबड्डीपटूची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या (प्रातिनिधिक फोटो)

Pune Bibwewadi Murder Case: कबड्डीपटूची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या (प्रातिनिधिक फोटो)

Pune Bibwewadi kabaddi player Murder Case, accused arrested: पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात आला आहे.

पुणे, 13 ऑक्टोबर : पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटूच्या हत्या (Kabaddi player) प्रकऱणातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Pune Bibwewadi murder case accused arrested) आहेत. बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन मुलीची कोयत्याने हत्या करुन आरोपी लपून बसला होता. या हत्याकांडाने पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. अखेर 12 तासांच्या आतच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स परिसरात आरोपी लबून बसला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Bibwewadi kabaddi player murder case all accused arrested) काय आहे प्रकरण? पुण्यात एका 14 वर्षीय कबड्डीपट्टू अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (12 ऑक्टोबर 2021) बिबेवाडीमध्ये घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथं आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी इतर मुली कबड्डी खेळत होत्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. आरोपीने पीडित मुलीचा कोयत्याने गळा चिरून हत्या केली. हत्येच्या वेळी त्याच्याकडे धाक दाखवण्यासाठी टॉय गन सुद्धा होती, अशीही माहिती समोर आली. रागाच्या भरात त्याने कोयत्याने सपासप वार केले. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 'हे कृत्य राक्षसी वृत्तीचे, वेळीच ठेचून काढले पाहिजेत', अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थीनीची कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 'ही घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो', असं अजित पवार म्हणाले. तसंच, 'तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Pune

पुढील बातम्या