Home /News /pune /

Pune: राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, धावपळीत महिला दरीत कोसळली

Pune: राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, धावपळीत महिला दरीत कोसळली

राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, धावपळीत महिला दरीत कोसळली

राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, धावपळीत महिला दरीत कोसळली

Pune News: राजगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. याच दरम्यान एका महिलेचा पाय घसरुन दरीत कोसळली.

    पुणे, 24 एप्रिल : राजगडावर (Rajgad fort) पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला (bees attack on tourists) केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या मधमाशांच्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आणि पर्यटकांची धावपळ सुरू झाली. या धावपळीत गडाच्या बुरुजावरुन एक महिला थेट दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. (Woman fall down in valley after bees attack at Rajgad fort Pune) मिळालेल्या माहितीनुसार, राजगड किल्ल्यावर काही पर्यटक शनिवारी पर्यटनासाठी गेले होते. याच दरम्यान मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. मधमाशा अंगावर आल्याने पर्यटकांची धावपळ सुरू झाली. यावेळी रोहिणी वराट यांचा पाय घसरला आणि त्या 100 फूट खोल दरीत कोसळल्या. शनिवारी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पर्यटक महिला दरीत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाचा : अमरावतीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर बेछूट गोळीबार राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर पर्यटक गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक जखमी झाले आहेत. तर पाय घसरून दरीत कोसळल्याने रोहिणी वराट या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रोहिणी वराट यांना नसरापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील इंजिनिअर्सवर मधमाशांचा हल्ला मार्च महिन्यात लोणावळ्यालगत आयटी अभियंत्यांच्या ग्रुपवर मधमाशांनी हल्ला चढवला. मधमाशांनी शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतल्याने, सर्वांची अवस्था दयनीय झाली. त्यामुळे त्यांना चालणं ही कठीण झालं. काहीजण बेशुद्ध पडले. शेवटी वन्य जीव मावळ संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने त्या 11 जणांची या प्रसंगातून सुटका केली. अकरा जणांच्या ग्रुपमध्ये तरुणींचा ही समावेश होता. पिंपरी-चिंचवडमधून हा ग्रुप कातळधार धबधब्याच्या दरीत उतरला. तेव्हा काहींनी धूम्रपान केलं आणि तो धूर आगी मोहोळच्या दिशेने गेला. त्यामुळे मधमाश्या उठल्या आणि त्यांनी या ग्रुपवर हल्ला चढवला. मधमाशांनी शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्यांना चालणं ही कठीण झालं. ते आहे त्याच ठिकाणी झोपून राहिले. त्यातील काही बेशुद्ध झाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune

    पुढील बातम्या