पुणेकरांनी करून दाखवलं! अवघ्या 6 आठवड्यात बनवली 100 टक्के स्वदेशी आणि स्वस्त COVID-19 टेस्ट किट

पुणेकरांनी करून दाखवलं! अवघ्या 6 आठवड्यात बनवली 100 टक्के स्वदेशी आणि स्वस्त COVID-19 टेस्ट किट

Coronavirus ची लागण झाल्यानंतर सध्या 7 तासांच त्याचं निदान होतं. या नव्या किटमध्ये लागण झाल्याच्या फक्त अडीच तासांमध्येच त्याचं निदान करता येणार आहे. सध्या वापरात असलेल्या विदेशी किटच्या तुलनेत याची किंमत अगदी कमी आहे.

  • Share this:

पुणे 24 मार्च : कोरोना व्हायरसने सर्व जग हादरून गेलं आहे. जगातल्या 180 देशांना त्याने विळखा घातलाय. दररोज काही हजार रुग्णांची त्यात भर पडत असून मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी सध्या देशात मोजक्याच लॅब उपलब्ध आहेत. त्याची संख्या आता वाढविण्यात येत आहे. त्यासाठीची टेस्ट करण्यासाठीची किटही विदेशातूनच मागवावी लागत होती. या अडचणीवर पुण्यातल्या एका कंपनीने मात केली असून अवघ्या 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे. देशातल्या संबंधित सर्व संस्थांनी त्याला मान्यता दिली असून त्याचं उत्पादन आता सुरू होणार आहे.

पुण्यातल्या Mylab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने ही किट बनवली आहे. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी तयार केल्या आहेत. सध्या भारत जर्मनीमधून Covid-19 च्या टेस्ट किट मागवतो आहे. मात्र जगभरातूनच या किट्सला मागणी असल्याने त्या मिळविण्यात अडचणीही येतात. त्याबरोबर त्या काहीशा महागड्याही आहेत. ही स्वदेशी किट बाहेरच्या किट्सच्या मानाने स्वस्त असल्याची माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे रणजित देसाई यांनी दिली. "आम्ही एका आठवड्यात एक ते दीड लाख किट्स तयार करू शकतो. यांची किंमत विदेशी किटपेक्षा चौपटीने स्वस्त आहे."

WHO आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही किट तयार करण्यात आली आहे. त्याला देशातल्या FDA आणि  Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) आणि ICMR या संस्थांनीही मान्यता दिली आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. अतिशय विक्रमी कालावधीत ही किट तयार करण्यात आली असून सरकारच्या विविध संस्थांनीही त्याला अतिशय तत्परतेने मान्यता दिली अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली.

 हे वाचा- महाभयंकर Coronvirus ला रोखणारी लस तयार पण.... काय आहे FACT?

पुण्यातल्या या लॅबने तयार केलेली किट 80,000 रुपयांना आहे. एका किटमध्ये किमान 100 जणांची टेस्ट होऊ शकते. भारतात एक लाख लोकांमागे अतिशय कमी टेस्टिंग केलं जातं असल्याचंही म्हटलं जातं. आता स्वदेशी किट तयार झाल्याने त्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या जर्मनीच्या ज्या कंपनीकडून या किट आयात केल्या जातात त्यापेक्षा अतिशय कमी किंमतीत ही किट तयार झाली आहे. त्याच बरोबर त्याचा दर्जाही अतिशय उच्च क्षमतेचा आहे. सध्या कोरोनाची लागण झाल्यानंतर सात तासानंतरच टेस्टमध्ये आढळून येतं. या नव्या किटमध्ये लागण झाल्याच्या फक्त अडीच तासांमध्येच त्याचं निदान करता येणार आहे.

First published: March 24, 2020, 7:22 AM IST

ताज्या बातम्या