S M L

बांगलादेशातून पुण्यात येऊन घरफोडी करणारी टोळी जेरबंद

ही टोळी कात्रजच्या परिसरात भाड्याने राहत असल्याचं उघड झालंय.

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2017 10:59 AM IST

बांगलादेशातून पुण्यात येऊन घरफोडी करणारी टोळी जेरबंद

29 नोव्हेंबर : बांगलादेशातून पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने अटक केलीये. या कारवाईत तीन घरफोड्या पोलिसांनी उघडकीस आणल्या असून जवळपास तीन लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय.

या प्रकरणातील आरोपी इदानूर रहेमान राकिब आणि जाकीर कोबिद हुसेन यांना वर्षभरापूर्वीही पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सक्तीने बांग्लादेशात पाठवून दिले होते आणि त्यांचे पासपोर्ट ही पुणे पोलिसांनी जप्त केले होते.

मात्र तरीही पुन्हा महिन्याभरातच हे आरोपी गैरमार्गाने भारतात दाखल झाले आणि त्यांनी तीन घरफोड्या केल्या. दरम्यानच्या काळात ते कात्रजच्या परिसरात भाड्याने राहत असल्याचं उघड झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 10:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close