रिक्षापेक्षा विमानच परवडलं असतं, पाहा इंजीनिअरला ऑफिसला जाणं किती महागात पडलं!

सॉफ्टवेअर इंजीनिअर नोकरीच्या संदर्भात बुधवारी बंगळूरहून पुण्यात आला होता. इंजिनीअरने सकाळी 5 वाजता कात्रज-देहू रोड बायपास इथून पुणे शहरासाठी रिक्षा केली. रिक्षा चालकाने इंजिनीअरकडून भाडं म्हणून 4400 रुपये घेतले.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 01:22 PM IST

रिक्षापेक्षा विमानच परवडलं असतं, पाहा इंजीनिअरला ऑफिसला जाणं किती महागात पडलं!

पुणे, 22 सप्टेंबर : पुणे-बंगळुरू मार्गावरून पुण्याला येणं एका इंजीनिअरला चांगलंच महागात पडलं आहे. बंगळूरहून पुण्याला येत असताना एका इंजीनिअरकडून रिक्षा चालकाने अवघ्या 18 किलोमीटरचे 4400 रुपये वसूल केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मीटरच्या हिशोबाने त्यानं हे भाडं वसूल केलं आहे. इंजीनिअर पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. या प्रकाराची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

भास्कर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सॉफ्टवेअर इंजीनिअर नोकरीच्या संदर्भात बुधवारी बंगळूरहून पुण्यात आला होता. इंजिनीअरने सकाळी 5 वाजता कात्रज-देहू रोड बायपास इथून पुणे शहरासाठी रिक्षा केली. रिक्षा चालकाने इंजिनीअरकडून भाडं म्हणून 4400 रुपये घेतले. पुणे शहर ते कात्रज-देहू रोड बायपास ते अंतर 18 किलोमीटर आहे. आणि त्याचं साधारण भाडं 300 ते 400 रुपये आहे. खरंतर 4400 रुपये भाडं मागितल्यानंतर प्रवाशाला धक्काच बसला. त्याने एवढं भाडं देण्यासाठी नकार दिला पण त्यानंतर रिक्षा चालकाने वाद घालण्यास सुरुवात केली.

वाहन चालक होता नशेत, भांडणानंतर केले अश्लील कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 18 किमी अंतराच्या मीटरमध्ये 3200 रुपयांचं भाडं दाखवण्यात आलं. परंतु रिक्षा चालकाने 4400 रुपये वसूल केले. भाड्याच्या व्यतिरिक्त, ड्रायव्हरने शहरात प्रवेश करण्यासाठी 600 रुपये आणि शहराबाहेर जाण्यासाठी 600 रुपये शुल्क आकारला. इंजीनिअरने रिक्षा चालकाला विरोध केला असता त्याने अश्लील कृत्य केलं. रिक्षा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

इतर बातम्या - एका सिगारेटने मैत्रीची झाली राख, 4 अल्पवयीन मुलांनी एकाला केलं ठार!

Loading...

प्रवासी आपल्याविरोधात पोलिसांत जाणार हे लक्षात येताच रिक्षा चालकाने पळ काढला. दरम्यान, आता पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. याआधीही एका वाहनचालकाला तब्बल 1 लाख 16 हजारांचा दंड भरावा लागला असल्याची बातमी समोर आली होती. दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या मोटर व्हेइकल अॅक्टनुसार वाहनचालकांना जबर दंड भरावा लागतोय. असंच दिल्लीतल्या एका वाहनचालकाला ओव्हरलोडिंगमुळे तब्बल 1 लाख 16 हजार रुपयांचा दंड भरावा लागला. यामीन खान या वाहनधारकाने ड्रायव्हर जकर हुसेनला हे दंडाचे पैसे दिले आणि हा दंड RTO मध्ये जाऊन जमा करायला सांगितलं. त्यांचा ड्रायव्हर हे चलन भरण्याऐवजी पैसे घेऊन फरार झाला!

इतर बातम्या - पिंपरी चिंचवडकरांनो, हे आहेत तुमचे नवीन पोलीस आयुक्त!

मालकाला शिकवला धडा

यामीन खान यांनी 5 महिन्यांपूर्वीच जकर हुसेनला नोकरीवर ठेवलं होतं. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे दंडाच्या रकमेचे पैसे दिले आणि दिल्लीच्या रेवाडी RTO कार्यालयात भरून यायला सांगितलं. ते पैसे भरण्यासाठी ड्रायव्हर गेला खरा पण नंतर मात्र गायब झाला. त्याने त्यांचे फोन घेणंही बदं केलं. यानंतर यामीन खान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.उत्तर प्रदेशात फिरोजाबादच्या पोलिसांनी ड्रायव्हर जकर हुसेनला अटक करून दिल्लीला आणलं आणि त्याच्याकडून पैसे वसूल केले होते.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune news
First Published: Sep 22, 2019 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...