डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार, कोर्टाने दिले आदेश

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार, कोर्टाने दिले आदेश

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी अर्थात डीएसके सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, (प्रतिनिधी)

पुणे, 23 ऑगस्ट- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी अर्थात डीएसके सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या 20 जप्त केल्या आहेत. त्यापैकी 13 महागड्या गाड्यांचा लवकरच लिलाव होणार आहे. या प्रक्रियेला कोर्टाने परवानगी दिली आहे.

पोलिसांनी फेब्रुवारी व मार्च 2018 मध्ये डीएसकेंच्या 20 आलिशान गाड्या जप्त केली होत्या. यात 19 चारचाकी तक एक दुचाकी आहे. या गाड्या पडून पडून खराब होत असल्याने पोलिसांनी गाड्या विकून पैसे ठेवीदारांना देण्यात उपयोगी पडणार असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गव‌‌ळी यांनी ही कामगिरी केली.

गाड्याची किंमत 2 कोटी 57 लाख 50 हजार रुपये

पोलिसांनी डीएसकेंची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे महागडी वाहने असल्याची माहिती समोर आली होती. डीएसकेंकडे बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा यांसारख्या कोट्यवधी रुपयांच्या अलिशान गाड्या होत्या. डीएसकेंच्या या 13 वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करून त्यातील आलेल्या रकमेतून आरोपींनी अनेक ठिकाणी मालमत्ता विकत घेतली. त्यातील 488 मालमत्तांचा शोध घेऊन जप्त करण्यात आल्या आहेत.

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना पुन्हा सरकारला आव्हान

Published by: Sandip Parolekar
First published: August 23, 2019, 9:37 AM IST
Tags: pune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading