'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!

पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये चोराट्यांच्या एटीएम मशीन चोरण्याचा प्रयन्त अयशस्वी झालाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2018 11:56 AM IST

'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!

पुणे, 23 जुलै : पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये चोराट्यांच्या एटीएम मशीन चोरण्याचा प्रयन्त अयशस्वी झालाय. बरं इतकंच नाही तर एटीएम मशीनमध्ये आग लागल्यामुळे 10 लाख रुपये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे 'तेल गेलं तूप गेलं हाती लागलं धुपाटणं' या म्हणीची इथे प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.

या भामट्या चोरांनी एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आणि मशीन कापायला सुरूवात केली. पण त्याच दरम्यान एटीएम मशीनमध्ये असलेल्या पैशांना आग लागली. ही आग इतकी मोठी होती की संपूर्ण मशीन त्यात जळून खाक झाली.

'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'

सुत्रांच्या माहितीनुसार, या एटीएम मशीनमध्ये 10 लाख रुपये होते. आग लागल्यामुळे मशीनमधल्या सगळ्या पैशांची राख झाली. सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि आता या प्रकरणाचा शोध सुरू आहे. यात चोरट्यांचाही शोध सुरू आहे.

हेही वाचा...

Loading...

आम्ही 'भारतीय जनते'चे मित्र आहोत - उद्धव ठाकरे

कर्णबधीर मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य कर्णबधिर संघटना उतरली रस्त्यावर

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...