'पुणे तिथे...' तब्बल 1 लाख पुणेकरांनी कोरोनाला हरवलं, नवीन आकडेवारी सांगते...

'पुणे तिथे...' तब्बल 1 लाख पुणेकरांनी कोरोनाला हरवलं, नवीन आकडेवारी सांगते...

पुणेकरांनी कोरोनावर मात केल्याने मोठा मानसिक दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

पुणे, 24 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांना कोरोनाचा विळखा बसला आहे. पण आता कोरोनावर मात करण्याचे प्रमाण वाढत आहे.   पुणे शहरात 1 लाख तर पिंपरी चिंचवड शहरातील 50 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे.  गेल्या काही दिवसांत पुणे परिसरात एकीकडे बाधित वाढत आहेत तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर हा 30 टक्के इतका झाला आहे. मात्र, दुसरीकडे आत्तापर्यंत 1 लाख पुणेकरांनी कोरोनावर मात केल्याने मोठा मानसिक दिलासा मिळाला आहे.

शहरात सध्या चाचण्याही वाढवल्या आहेत. सध्या 6 ते 6,500 चाचण्या दररोज केल्या जात आहेत. तसंच कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे.

तर 14 सप्टेंबरपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार,  दिवसभरात ११०० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकाच दिवसात १४५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २१ रूग्ण पुण्याबाहेरील आहे. सध्या ९२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुणे शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १२०७५७ वर पोहोचली आहे. तर

ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १७३९३ वर आहे. आतापर्यंत एकूण २८३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १००५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तर पुणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या 13 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या अहवालानुसार,  पुणे जिल्ह्यात  2,481 नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर एकूण रुग्णांची संख्या  2,27,307 वर पोहोचली आहे.

Published by: sachin Salve
First published: September 15, 2020, 7:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या