पुणे, 02 मार्च : पुण्यात सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक (army recruitment exam paper leak case) झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणी लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस (Pune Police) दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई करुन पेपर लिक करण्याचा पर्दाफाश केला आहे. बारामतीमधून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सैन्य भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. पण, 27 फेब्रुवारीलाच सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पुणे पोलीस आणि लष्कराच्या गुप्तचर संस्थेनं सापळा रचून दोन ठिकाणी समातंर पद्धतीने चौकशी केली. या प्रकरणी एका जणाला बारामतीमधून ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराट कोहलीचा विक्रम, हा कारनामा करणारा पहिला भारतीय सेलिब्रिटी
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लष्करातून सेवानिवृत्त वडिलांच्या मुलाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अरे आवरा यांना! बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी केला अतिरेक; आता रुग्णालयात झाली दाखल
28 फेब्रुवारी रोजी सैन्य भरतीची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. देशभरात ही परीक्षा होत होती. पण, परीक्षेच्या आदल्यादिवशी पेपर लीक होणार असून तो काही जणांना पुरवला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.