PMC नंतर महाराष्ट्रात आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा परिणाम सहकारी बँकेच्या सुमारे एक लाख ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 10:32 AM IST

PMC नंतर महाराष्ट्रात आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!

पुणे, 13 ऑक्टोबर : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा (PMC Bank Scam) कुठे शांत होत नाही तोच महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेने कोट्यवधी रुपयांची अनियमितता उघड झाली आहे. पुण्यातील मुख्यालय असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेडच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सहकार खात्याने संचालक मंडळाला बरखास्त केलं आहे. बँकेच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासकाची नेमणूकही करण्यात आली आहे. चौकशीत 300 कोटींचे कर्ज वाटप केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या बँकेचे खातेदार स्वत: चे पैसे बँकेतून काढू शकत नाहीत.

बँकेचे प्रवर्तक राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव भोसले

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा परिणाम सहकारी बँकेच्या सुमारे एक लाख ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेचे प्रवर्तक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य अनिल शिवाजीराव भोसले आहेत. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी 9 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, एप्रिल 2019 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या विशेष तपासणीत बँकेच्या कामकाजात अनेक 'गंभीर अनियमितता' उघडकीस आल्या आहेत.

बँकेचे सध्याचे संचालक मंडळ हटवलं

या आदेशात म्हटले आहे की, सहकारी संस्थांचे कुलसचिव आणि सहकारी आयुक्त यांनी आरबीआयशी सल्लामसलत केल्यानंतर बँकेचे विद्यमान संचालक मंडळ हटवले आहे. त्यांच्या जागी प्रशासक म्हणून उपजिल्हा निबंधक नारायण आघाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...

एक लाख ग्राहक बँकेतून पैसे काढू शकत नाहीत

संकटग्रस्त बँकांच्या ठेवीदारांची प्रकरणे उपस्थित करणारे गटाचे सदस्य मिहीर थत्ते म्हणाले की, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे सुमारे एक लाख खातेदार सध्या बँकेतून पैसे काढू शकत नाहीत. त्यांनी सांगितले की बनावट कर्जदारांना 300 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले गेले आहे, ज्यामुळे सध्याचे संकट उभे राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 10:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...