पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउनबाबत प्रशासनाचा नवीन निर्णय

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउनबाबत प्रशासनाचा नवीन निर्णय

13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे.

  • Share this:

पुणे, 11 जुलै : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर आज  नियमावली ठरवण्यासाठी पुणे महापालिकेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी  मनपा आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लॉकडाउनसाठी एक सारखीच नियमावाली असणार असल्याची शक्यता होती. पण, याबद्दल अद्याप निर्णय झाला नाही. तर लॉकडाउनच्या काळात पहिले पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. फक्त मेडिकल आणि दूध डेअरी सुरू राहणार आहे. तसंच भाजीपाला ही बंद राहणार असल्याची माहिती मिळतेय. पुण्यात वृत्तपत्र पहिले पाच दिवस बंद राहणार आहे. एवढंच नाहीतर  शहरात फिरण्यासाठी ही पोलिसांचा परवाना लागणार आहे.

अजित पवारांच्या निर्णयाला भाजपचा विरोध, गिरीश बापटांनी घेतली आक्रमक भूमिका

शुक्रवारीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे (Pune) शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad) पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे.

व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध

दरम्यान, दुसरीकडे पुणे शहर व्यापारी संघाचा लॉकडाउनला विरोध केला आहे. पुणे शहरात परत लॉकडाऊन झाला तर उद्रेक होईल, असंही व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद्र राका यांनी म्हटलं आहे. सातही दिवस दुकाने उघडी ठेवावी. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी वेळ असावी, अशा मागण्या व्यापारी संघानं केल्या आहेत. व्यापारी संघात सुमारे 40 हजार दुकानदार सदस्य आहेत. आता व्यापारी संघाच्या विरोधानंतर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणी महत्त्वाचं ठरणार आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी

'पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,' असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

Published by: sachin Salve
First published: July 11, 2020, 3:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या