पुण्यात आधी विचारला धर्म... नंतर केला बुरखा परिधान केलेल्या डॉक्टरवर हल्ला

अमेरिकन महिलेने बुरखा परिधान केलेल्या डॉक्टर महिलेला 'तू मुस्लिम आहे काय? असा प्रश्न केला. पीडित डॉक्टरने 'हो' असे उत्तर दिल्यानंतर अचानक तिच्यावर अमेरिकन महिलेने हल्ला केला.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 02:22 PM IST

पुण्यात आधी विचारला धर्म... नंतर केला बुरखा परिधान केलेल्या डॉक्टरवर हल्ला

पुणे,3 सप्टेंबर: पुणे शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुरखा परिधान केलेल्या एका 27 वर्षीय महिला डॉक्‍टरवर अमेरिकन महिलेने हल्ला केला. पीडित डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून 43 वर्षीय अमेरिकन महिलेविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. छावणी भागातील क्लोवर सेंटर बाजारात ही घटना घटली. दोन्ही महिला खरेदी करण्यासाठी बाजारात आल्या होत्या. तेव्हा अमेरिकन महिलेने डॉक्टर महिलेवर हल्ला केला.

आधी विचारला धर्म...

पोलिसांनी सांगितले की, अमेरिकन महिलेने बुरखा परिधान केलेल्या डॉक्टर महिलेला 'तू मुस्लिम आहे काय? असा प्रश्न केला. पीडित डॉक्टरने 'हो' असे उत्तर दिल्यानंतर अचानक तिच्यावर अमेरिकन महिलेने हल्ला केला. तिला शिवीगाळही केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अमेरिकन दूतावासाला माहिती दिली आहे.

अमेरिकन महिलेचे मानसिक स्वाथ्य ठीक नाही..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमेरिकन महिलेचे मानसिक स्वाथ्य ठीक नाही. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस महिला आरोपीची चौकशी करत आहे.

Loading...

परळीत प्रेमप्रकरणातून हत्या.. अल्पवयीन भावांनी बहिणीच्या प्रियकराला संपवले

परळीत प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीच्या प्रियकरावर दोन अल्पवयीन भावांनी ब्लेडने सपासप वार केले. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी (2 सप्टेंबर) झालेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण परळी शहर हादरले आहे.

मिळालेली माहिती अशी की, अनिल हालगे (वय-22, रा. गणेशपार) या युवकाचा मृतदेह पोलीस स्टेशनजवळील कब्रस्तानमध्ये सोमवारी सकाळी आढळून आला होता. तरुणाच्या शरीरावर तिक्ष शस्त्राने वार केल्याचे पोलीस तपासात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

प्रेमप्रकरणातून हत्या...

आरोपींच्या बहिणीचे अनिलसोबत प्रेमसंबंध होते. याच रागातूनच आरोपीने अनिलवर ब्लेडने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. अनिलच्या संपूर्ण शरीरावर वार करण्यात आले आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हत्येत वापरलेले दगड, ब्लेड आणि तुकडे केलेला मृत अनिलचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

TikTokसाठी काही पण! तरुणानं VIDEO शूट करण्यासाठी जीप दिली पेटवून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2019 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...